जळगाव : प्रतिनिधी
आईने किराणा दुकानावरून साहित्य मागविले असता ते घेण्यासाठी १९ वर्षीय तरुणी गेली असता यावेळी एका दुकानाजवळ ३० वर्षीय इसमाने तरुणीसोबत चुकीचे कृत्य केल्याप्रकरणी नशिराबाद पोलिसात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, नशिराबाद या गावात १९ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.२ नोव्हेबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास तरुणीच्या आईने दुकानातून सामान घेण्यासाठी पाठविले असता. तरुणी दुकानात जात असतांना याच परिसरातील एका ३० वर्षीय व्यक्तीने दुकानाजवळ असतांना तरुणीसोबत चुकीचे वर्तन करीत तिला म्हणाला कि तु मला खूप आवडते यावर तुझे म्हणणे काय ? तर तरुणीने त्याला धक्का देत मी तुझे नाव माझ्या परिवाराला सांगते असे म्हणाली असता त्याने तरुणीला घरी जर सांगितले तर तुझ्या परीवाराला मारून टाकेल अशी धमकी देखील यावेळी दिली. त्यानंतर तरुणीने घरी जावून थेट नशिराबाद पोलिसात धाव घेत ३० वर्षीय इसमाविरोधात विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव हे करीत आहेत.