Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव रेल्वे स्थानकावर तरुणाला मारहाण करीत सोन्याची चेन लांबविली !
    क्राईम

    जळगाव रेल्वे स्थानकावर तरुणाला मारहाण करीत सोन्याची चेन लांबविली !

    editor deskBy editor deskOctober 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    मध्यरात्री एक ३१ वर्षीय व्यापारी रेल्वे स्थानकावर कामानिमित्त आला असतांना काही तरुणांनी त्याला मारहाण करीत त्याच्या गळ्यातील ९७ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन ओढून नेल्याची घटना बुधवारी मध्यरात्री १ वाजेच्या जळगाव शहरातील रेल्वे स्थानकासमोरील रिक्षा स्टॉपजवळ घडली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे भूषण हिरालाल चौधरी (वय ३१) हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. व्यापार करून तो आपला उदरनिर्वाह करतो. बुधवारी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने जळगाव रेल्वेस्थानकासमोरील रिक्षा स्टॉप येथे आलेला होता. त्यावेळी चेतन दिलीप येवले (वय १९) आणि अविनाश विजय रंधे (वय २५) यांनी कारण नसताना भूषण चौधरी याला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील ९७ हजार रुपये किमतीची तीन तोळ्याची सोन्याची चेन जबरी हिसकावून पसार झाले. हा प्रकार घडल्यानंतर भूषणने जळगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी चेतन दिलीप येवले आणि अविनाश विजय रंधे (दोन्ही रा. नशिराबाद) यांच्या विरोधात जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि बशिर तडवी करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    पाचोऱ्यातील महिलेची ८.५० लाखांची ऑनलाइन फसवणूक

    February 12, 2026

    धावत्या बसमध्ये ३८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला

    February 12, 2026

    मोठी बातमी ; मंत्री मंत्री एकनाथ खडसेंवर गुन्हा दाखल !

    February 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.