• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

कोळी समाजाच्या महिलांकडून साडी-चोळी, बांगड्यांचा शासनाला आहेर देण्याचा प्रयत्न !

editor desk by editor desk
October 26, 2023
in जळगाव, राजकारण, राज्य, सामाजिक
0
कोळी समाजाच्या महिलांकडून साडी-चोळी, बांगड्यांचा शासनाला आहेर देण्याचा प्रयत्न !

जळगाव : प्रतिनिधी 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या सोळा दिवसांपासून आदिवासी कोळी समाजातर्फे विविध मागण्यांच्या संदर्भात आमरण उपोषण सुरू आहे. बुधवारी इंदुबाई बहुउद्देशीय महिला मंडळातर्फे शासनाला साडी, चोळी, बांगड्यांचा आहेर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत देण्याचा प्रयत्न पोलिसांच्या प्रयत्नाने फासला; पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत हे साहित्य जप्त केले. नंतर जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.

आदिवासी कोळी समाज समन्वय समितीतर्फे १० ऑक्टोबरपासून आदिवासी कोळी समाजाला अनुसूचित जमातीचा दाखला, जातवैधता प्रमाणपत्र मिळावे, यासह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू आहे. बुधवारी, दि. २५ रोजी, इंदुबाई बहुउद्देशीय मंडळातर्फे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन व साडी-चोळी, बांगड्या देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी महिला आंदोलनकर्त्यांना साडी-चोळी व बांगड्यांचा आहेर देता येणार नाही, असे सांगितले. केवळ निवेदन द्यावे, अशी विनंती केली; तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महिलांना समजावत तुम्ही केवळ निवेदन द्यावे, आणलेल्या वस्तू गरीब महिलेला द्या, अशी विनंती केली. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व आमदार सुरेश भोळे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी जिल्हाधिकारी व आमदार यांनी तुमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले. प्रा.भाऊसाहेब सोनवणे, मंगला सोनवणे, बबलू सपकाळे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

Previous Post

कोळी समाजाच्या महिलांकडून साडी-चोळी, बांगड्यांचा शासनाला आहेर देण्याचा प्रयत्न

Next Post

संतापजनक : तरुण मुलाने वृद्ध आईला जिवंत जाळले !

Next Post
धक्कादायक : अमळनेरात महिलांना जाळण्याचा प्रयत्न ; एक गंभीर

संतापजनक : तरुण मुलाने वृद्ध आईला जिवंत जाळले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !
क्राईम

माता-भगिनींचं कुंकू पुसलं गेलं, जवानांचा मृत्यू झाला, ते पण मोदींमुळेच’ ; संजय राऊत !

June 26, 2025
जळगावातील वखारीला भीषण आग !
क्राईम

जळगावातील वखारीला भीषण आग !

June 26, 2025
धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !
क्राईम

धक्कादायक : अलकनंदा नदीत १८ प्रवाशांनी भरलेली बस कोसळली !

June 26, 2025
अमळनेरजवळ अपघात तरुण जागीच ठार
क्राईम

जळगावात दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार दोघे जखमी !

June 26, 2025
भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !
क्राईम

भुसावळात एलसीबीची कारवाई : दुचाकी चोरणारे अटकेत !

June 26, 2025
एकाची ३९ हजारात ऑनलाईन फसवणूक
क्राईम

अज्ञात व्यक्तीने सेवानिवृत्त अधिकाऱ्याची केली ३१ लाखात फसवणूक !

June 26, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group