जळगाव : प्रतिनिधी
जळगाव तालुक्यातील असोदा येथील सत्तार हैदर खाटीक व कमृंनिसा सत्तार खाटीक यांच्या घरी शॉर्टसर्किटमुळे आगित संसार खाक झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे खाटीक परिवार मोठ्या अडचणीत आले होते. याची दखल घेत माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी लागलीच घटनास्थळी जावून पाहणी करीत मदत देखील दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, असोदा येथील सत्तार हैदर खाटीक व कमृंनिसा सत्तार खाटीक यांच्या शॉर्टसर्किटमुळे आगित खाक झालेल्या घराची माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी पाहणी केली संपुर्ण घर आगीत खाक झाल्यामुळे खाटीक कुटुंब प्रचंड तणावात आहे, आदरणीय आप्पासाहेबांनी खाटीक कुटुंबाचे सात्वन केले व जीवनावश्यक वस्तुंसाठी 5000 रुपयाची मदत केली सोबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक गोकुळ चव्हाण, डॉ अरुण पाटील, डॉ रिझवान खाटीक, ग्रामपंचायत सदस्य विजय भोळे, हेमंत पाटील, धवल पाटील, परिक्षीत पाटील, बंटी बारी, बंटी पाटील, सलीम समद खाटीक, गाफ्फर शेख इसाक खाटीक, गुलाब नदर खाटीक, शकिल वहाब खाटीक, अकील शेख वहाब खाटीक, बरक्त अमान खाटीक, सलमान फाकृद्दिन खाटीक व ग्रामस्थ उपस्थित होते