Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाजप नेत्यांनी दिल्या आमदारांना सूचना : मंत्रिपदाची अपेक्षा करु नका !
    राजकारण

    भाजप नेत्यांनी दिल्या आमदारांना सूचना : मंत्रिपदाची अपेक्षा करु नका !

    editor deskBy editor deskSeptember 22, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

     

    देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालाचाली सुरु झाल्या असून देशातील प्रमुख विरोधी पक्षांच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. या विरोधकांची इंडिया आघाडी पुढची रणनीती ठरत आहे. त्यानंतर भाजपने देखील आता कंबर कसलं आहे. भाजपच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्व भाजप आमदारांना कामाला लागण्याची सूचना दिली आहे. तसेच मंत्रिपदाची अपेक्षा करु नका, पण कामाला लागा, असे आदेशच आमदारांना देण्यात आले आहेत.

    मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा आपल्याला लोकसभेची निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे कामाला लागा, अशी सूचना भाजपच्या वरिष्ठांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभेच्या मिशन 45 प्लससाटी भाजपकडून आमदारांवर मोठी जबादारी सोपविण्यात आली आहे.मंत्रिपदाची अपेक्षा न ठेवता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश भाजपच्या वरिष्ठांनी राज्यातील सर्व आमदांराना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    भाजपच्या कार्यकारिणीची पुण्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2024 च्या महा विजयाचे शिलेदार बना, अशी सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.

    नरेंद्र मोदींच्या देशसेवेत हातभार लावण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. या संधीचं सोनं करा. आजपासूनच पुणे महानगरपालिकेच्या वतीने निवडणुकीच्या तयारीला लागा, असा आदेश बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. पुणे जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघ आपल्याला जिंकायचे आहेत. त्यामुळे आजपासून कामाला लागा, अशी सूचना चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील नवनिर्वाचित कार्यकारणीच्या बैठकीत दिल्या.

    या बैठकीनंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “महविजय 2024 चा संकल्प आज झाला. आमचा 45 जागा निवडून आणण्याचा संकल्प आहे. पुण्यातील मतदारसंघ राज्यातील इतर मतदारसंघांच्या तुलनेत सर्वात जास्त मतांनी जिंकावीत, असं नियोजन केलं आहे. मत हे कर्ज आहे आणि हे जिंकून नागरिकांना परत देणे हा आमचा विश्वास आहे आणि आम्ही नागरिकांना पुन्हा देऊ. आमच्या पक्षात कोणीही नाराज नाही. देशासाठी, राज्यासाठी आणि त्याच्या भविष्यासाठी काम करायचं आहे”, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

    #bjp Devendra fadnvis Loksabha nivdnuk
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाढदिवसाचा अनोखा आदर्श! नगरसेवक इंजि. नरेंद्र पाटील यांनी गरजूंना रेनकोट वाटून दिला सामाजिक संदेश

    July 30, 2026

    विद्यार्थी-शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी भाजपला रामराम! अमळनेरचे श्याम पाटील यांचा सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

    July 26, 2026

    चाळीसगावच्या निर्णयविरोधात
    किशोर आप्पांचा एल्गार!

    July 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.