लाईव्ह महाराष्ट्र न्यूज: पोलीस भरतीला आलेल्या एका उमेदवाराने कॉपी करण्यासाठी माक्स चा उपयोग केला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथील न्यू इंग्लिश स्कूल केंद्रावर एका मैदानात कानात ज्वारीच्या दाणे एवढे ब्लूटूथ बसून मार्चमध्ये लपलेली होती हा सगळा प्रकार तपासणीत आडला मार्चमध्ये चिप पाहून पोलिसांनाही धक्का बसला.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शिपाई पदासाठी शुक्रवारी राज्यभरात परीक्षा पार पडल्या. एकूण 720 पदांसाठी राज्यभरातून 1 लाख 20 हजार उमेदवारांचे अर्ज आले होते. या औरंगाबाद जिल्ह्यातील 80 केंद्रांवर 21 हजार उमेदवारांची सोय करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील करमाड येथील न्यू हायस्कूल केंद्रावरील एका उमेदवाराने अत्यंत हायटेक पद्धतीने कॉपी केल्याचे उघडकीस आले. एका उमेदवाराने कानात अगदी खोल ज्वारीच्या दाण्याएवडे ब्लूटूष बसवून मास्कमध्ये चिप लपवली होती. तपासणीत पोलिसांनी त्याला मास्क काढायला लावला.मास्कमध्ये चिप असल्याचे पाहून पोलिसही थक्क झाले. तसेच करण त्र्यंबक सुंदरडे याच्या जागेवर डमी परीक्षा देणारा हा उमेदवार आकाश जारवाल असल्याचे पोलिसांच्या चौकशीत उघड झाले. करण आकाशविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.