भुसावळ : प्रतिनिधी
भुसावळ तालुक्यातील फेकरी टोलनाका येथे शुल्लक कारणाने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केलायची घटना घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील खडका रोड परिसरातील रहिवासी अशफाक जाबीर बागवान उर्फ आम्रपाली जोगी (वय- २६) हे दि.२६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील फेकरी टोलनाका येथील हॉटेलच्या मागे असलेल्या जागेत संशयित आरोपी दानिश शेख, बाबा काल्या, सोनू शेख सर्व रा. खडका ता.भुसावळ या तिघांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच एकाने लोखंडी रॉडने मारहाण केल्याने दुखापत केली. तसेच एकाने धारदार वस्तूने केस कापून दुखापत केली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोहेकॉ योगेश पालवे करीत आहे.