भुसावळ : प्रतिनिधी
जबरी चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या महिलेला अटक करण्यासाठी नंदुरबार गुन्हे शाखेच्या पथक भुसावळ येथे आले होते. या संशयित महिला आरोपीला अटक करत असताना इराणी महिलांनी हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी तीन महिलांविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात चेन चोरी प्रकरणी गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात भुसावळातील एका महिलेचा सहभाग होता. या संशयित महिलेला अटक करण्यासाठी नंदुरबार गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी भुसावळात आले. स्थानिक बाजारपेठ पोलिसांची मदत घेत नंदुरबार पोलिस पथक सायंकाळी पापा नगरात गेले. संशयित महिलेस ताब्यात घेताच या महिले कपडे फाडत आरडा-ओरड केली. जमाव एकत्र आला आणि गुन्हे शाखेच्या हवालदार महिलेस धक्का दिला तसेच दोन महिलांनी महिला पोलिस राखी बडगुजर व ललिता बारी या पोलिसांनी अशाही परिस्थिती संशयित महिलेस ताब्यात घेवून नंदुरबार येथे नेले. याप्रकरणी तीनही महिलांविरुद्ध गुन्ह दाखल करण्यात आला. तपास प्रभारी पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहे.