भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला बंदुकीचा धाक दाखवून वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला एका तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील एका गावात पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी शिक्षण घेत असून जुलै २०२१ ते २०२३ दरम्यान संशयित आरोपी अजय गोडाले याने पीडित अल्पवयीन मुलीला नियमित बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याचा प्रकार जुलै 2021 ते 21 जुलै 2023 दरम्यान केला. यात पीडीतेला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी सुद्धा आरोपीने दिली याप्रकरणी पीडितेने बाजारपेठ पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यावरून आरोपी अजय गिरधारी गोड आले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये करीत आहे.