भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील पाटील मळा जवळील मोकळ्या जागेत (ता.७) रोजी दुपारी ०२.२० वाजेच्या सुमारास शेख दानिश शेख नाशिर व प्रफुल्ल पाटील असे गावठी पिस्टल व राउंड कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार शहरातील पाटील मळा जवळील मोकळ्या जागेत दोन तरुण गावठी पिस्टल कब्जात बाळगत आहेत.या माहितीच्या निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली मिळलेल्या आधारे पोलिसांनी सापळा रचून (ता.७) रोजी २.२० वाजेच्या सुमारास संशयित आरोपी शेख दानिश शेख नाशिर (वय २८) राहणार आझाद नगर भुसावळ यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या अंगझडतीमध्ये त्यांच्या कमरेस मागील बाजूस पॅन्ट मध्ये एक गावठी बनावटी पिस्टल मिळून आली.सदर बनावटी पिस्टल हे संशयित आरोपी प्रफुल्ल आनंदा पाटील (वय २९) राहणार आकाश फोम जवळ भुसावळ यांच्या कडून पंचवीस हजार रुपयात विकत घेतली होती. सदरील गावठी पिस्टल व राउंड कब्जात बाळगून विक्री करण्याच्या उद्देशाने मिळून आलेला आहे म्हणून बाजारपेठ पोलीस स्टेशनला पोकॉ .सचिन रमेश पोळ यांच्या फिर्यादीवरून शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक कारवाई साठी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तपास पोहेकॉ.रमण सुरळकर करीत आहे.