भुसावळ : प्रतिनिधी
येथील बसस्थानकात चाकूचा धाक दाखवून खिशातील ५० हजारांची रोकड हिसकावून चोरटा पोबारा झाल्याची घटना घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील एकनाथ बाबूराव निळे निवृत्त कर्मचारी आहेत. ओझरखेडा येथे शेती असल्याने ये- जा करतात. बुधवारी निळे दाम्पत्य भुसावळ बसस्थानकात बसची वाट पाहत होते. दुपारी कमरेला चाकू लावून किती पैसे आहेत ते दे, अशी धमकी देत, खिशातील ५० हजार काढून चोरटा पसार झाला. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांत नोंद करण्यात आली असून, तपास एपीआय सुदर्शन वाघमारे करीत आहेत.