Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मटणाच्या तुकड्यावरून मित्राने घेतला जीव !
    क्राईम

    मटणाच्या तुकड्यावरून मित्राने घेतला जीव !

    editor deskBy editor deskMay 31, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजी नगर ; वृत्तसंस्था 

    कोण जास्त मटण खाणार? या वादावरून भयंकर प्रकार घडला आहे. या वादात मित्राने मित्राची हत्या केली आहे. हि घटना छत्रपती संभाजीनगरात घडली आहे. घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सिल्लोड तालुक्यातील धारला या गावात ही घटना घडली आहे. जितेंद्र धृवे आणि ओमजय सूर्यवंशी या दोघांमध्ये मटणाचा वाद सुरू होता. या वादात ओमजयने जितेंद्रच्या डोक्यात रॉड मारली. मारहाण झाल्यानंतर जितेंद्रचा मृत्यू झाला.

    सिल्लोड तालुक्यातील धारला येथे शेतात मटणाची पार्टी सुरू होती. या पार्टीत मटन कोण जास्त खाणार? यावरून दोन मित्रांमध्ये वाद निर्माण झाला. यानंतर ओमजयने केलेल्या हल्ल्यात जितेंद्रचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे हे दोघे मित्र असून मध्य प्रदेशमधील आहेत. महाराष्ट्रामध्ये ते काम करण्यासाठी आले आहे.

    मटन कोण जास्त खाणार? यावरून दोघात चांगलाच वाद निर्माण झाला होता. दोघेही दारूच्या नशेत असल्याने शेत मालकाने त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, या मुद्द्यावरून दोघांचे भांडण थांबत नव्हते. संतप्त झालेल्या ओमजयने नशेत जितेंद्रवर वार केला, यातच जितेंद्रचा मृत्यू झाला. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात खून झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    जळगावात नियमभंगावर रोडरोलर : कर्कश सायलेन्सर व फॅन्सी नंबर प्लेट्स चिरडून पोलिसांची कडक कारवाई

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.