भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील ३५ वर्षीय विवाहितेचा एकाने विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह राहायला आहे. दि २० रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास विवाहिता मजुरी करण्यासाठी जात असतांना एका डेअरी जवळील मुख्य रस्त्यावर संशयित आरोपीने महिलेचा वेळोवेळी पाठलाग करीत असे तसेच शिट्या मारून गाणे म्हणायचा मुख्य रस्त्यावरून जात असतांना अचानक संशयित आरोपी महिलेला म्हणाला कि, या महिलेने माझ्यावर केस केलेली आहे म्हणत घाणेरड्या शिवीगाळ करू लागला व अश्लील टोमणे देखील मारू लागला यामुळे विवाहितेला लज्जा उत्पन्न झाली या प्रकरणी महिलेने थेट भुसावळ तालुका पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. युनुस शेख हे करीत आहेत.