भुसावळ : प्रतिनिधी
मॉडेल रोड व पाणी गेटजवळील व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून खंडणी मागणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेने २४ तासांच्या आत जळगाव येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील यावल रोड पाणी गेटजवळ असलेल्या न्यू गुजराती स्वीटच्या कपिल मेहता यांना वीस ते पंचवीस वयोगटातील दोन तरुणांनी १० हजारांची खंडणी मागितली होती. एलसीबीचे निरीक्षक किसन नजन पाटील यांना, आरोपी जळगावला लपून राहत असल्याची माहिती मिळाली. यावरून कृष्णा देशमुख, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर यांच्या पथकाला माहिती देऊन खंडणी प्रकरणातील संशयित सोनू मोघे हा खोटेनगर येथे येत असल्याची माहिती मिळाली. तेथे सापळा लावत त्याला पथकाने ताब्यात घेतले. त्याची माहिती विचारली असता, योगेश्वर उर्फ सोनू हिरालाल मोघे (वय २८, हिरावाडी, पंचवटी, नाशिक ) असे सांगितले. त्याला भुसावळ शहर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.