Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : ६ वर्षीय मुलासह पित्याने घेतली विहिरीत उडी !
    क्राईम

    धक्कादायक : ६ वर्षीय मुलासह पित्याने घेतली विहिरीत उडी !

    editor deskBy editor deskMay 5, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मालेगाव : वृत्तसंस्था 

    तालुक्यातील एका ४२ वर्षीय शेतकरीने आपल्या ६ वर्षीय मुलाला घेत अजंग शिवारातील शेती शेती महामंडळाच्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

    मिळालेली माहिती अशी कि, मालेगाव तालुक्यातील आघार-ढवळेश्‍वर रस्त्यालगत राहणाऱ्या यशवंत लक्ष्मण हिरे (वय ४२) यांचा पशुखाद्यचा व्यवसाय आहे. विशेषत: म्हशींना लागणारे बिअर खाद्य ते घाऊक भावाने घेऊन ग्रामीण भागात त्यांच्या पिकअपमधून किरकोळ विक्रेत्यांना विकतात. आज सकाळी त्यांनी मुलगा रुद्र यशवंत हिरे (वय ६) यालाही बरोबर घेतले. शहरालगतच्या मनमाड चौफुलीवरुन बिअर खाद्य घेत ते पिकअपमध्ये भरले.अजंग-रावळगाव रस्त्यावरील शेती महामंडळाच्या विहिरीजवळ त्यांची पिकअप उभी होती. विहिरीबाहेर चपलांचे दोन जोड होते. दीर्घकाळ पिकअप उभी असल्याने परिसरातील काही नागरिकांना संशय आल्याने त्यांनी ही माहिती अजंग येथील पोलिसपाटीलांना दिली. पोलिसपाटीलांनी वडनेर खाकुर्डी पोलिसांना सांगितले.

    पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तातडीने मालेगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे शकील तैराक यांनी प्रथम यशवंत यांचा व नंतर रुद्रचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. यशवंत यांनी मुलगा रुद्रला मिठी मारली होती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात पाठविला. या घटनेमुळे आघार व परिसरात शोककळा पसरली आहे. आत्महत्या का केली याचा तपास पोलिस करीत आहेत. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची चर्चा होत असून परिसरात बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘जमीन घेण्यापेक्षा गोळ्या घाला’ : सरकारला शेतकऱ्यांचा संतप्त इशारा

    February 20, 2026

    बीड एसीबीची धडक कारवाई; तहसीलदारांविरोधात गुन्हा दाखल प्रक्रियेला सुरुवात

    February 20, 2026

    ‘मानवी बुद्धिमत्ता कमी पडते, AI मदत करू शकते’ – राहुल गांधींना सुनावली टिपणी

    February 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.