भुसावळ : प्रतिनिधी
जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून महिलासह अल्पवयीन मुलीना प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्या सोबत चुकीचे कृत्य केल्याच्या घटना दिवसेदिवस वाढ होत असतांना आता पुन्हा भुसावळ तालुक्यात एक संताजनक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात व लग्नाचे आमिष दाखवून तिथे शारीरिक शोषण करणाऱ्याविरुद्ध तालुका पोलिसात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
१४ वर्षांच्या या पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिचे शारीरिक शोषण केले. याप्रकरणी अल्पवयीन पीडितेने तालुका पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. या मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथे पाठवण्यात आल्याची माहिती मिळालेली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि प्रकाश वानखेडे, हेड कॉन्स्टेबल संजय तायडे करीत आहेत.



