भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील जामनेर रोडवरील वांजोळा परिसरातील रस्त्याच्या लागून तिसरे शेतात कोरड्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याने तो विहिरीच्या कपरात बसून आहे. शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या कोरड्या विहिरीत पडल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास शहरापासून जवळच असलेल्या निमगाव शिवारात घडली. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरीकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वनविभागाला माजी नगरसेवक पिंटू कोठारी यांनी सकाळी माहिती कळवल्यानंतर सुमारे २२ कर्मचार्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
कुर्हा भागात यापूर्वीही बिबट्याचा संचार आढळला असून मध्यरात्री शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या निमगाव शिवारातील एका कोरड्या विहिरीत कोसळल्याचा अंदाज आहे मात्र विहिर खोल असल्याने त्यास बाहेर पडता आले नाही मात्र रविवारी पहाटे काही नागरीकांना विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती कळताच अनेकांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली.