भुसावळ : प्रतिनिधी
शहरातील शिरपुर कन्हाळा रोडवरील वल्डस्कुलचे बाजुला रोडवर सार्व जागी काही इसम बनावट सोने असल्याचे माहिती असून सुद्धा संबंधित इसमास खरे असल्याचे भासवून फसवणूक करतांना मिळून आले म्हणून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मिळालेली माहिती अशी कि, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना बातमीदारांकडून गोपनीय माहिती मिळाल्याच्या आधारे तत्काळ पथक तयार करून घटनास्थळी रवाना केले.पथक दिनांक २९ एप्रिल रोजी 05.15 वाजता शिरपुर कन्हाळा रोडवरील वल्डस्कुलचे बाजुला रोडवर सार्व जागी सापळा रचून होते.काही वेळेनंतर संबंधित आरोपी नामे किसनलाल दौलतराम बागरी वय 36 रा.बल्लुर ता.जि.सिरोही राजस्थान,बाबुलाल ओबाराम बागरी वय 42 रा.लक्ष्मी नगर बिबलसर ता.जि. जालोद राजस्थान हे स्वताचे फायदयासाठी त्यांचे जवळील सोन्याचे दागीने (मण्याची माळ हे नकली असल्याचे माहित असुन सुध्दा स्वताचे ताब्यात बाळगुन अप्रामाणीगकपणे ते खरे असल्याचे भासवुन भुसावळ येथील एकास विक्री करून त्यांची फसवणुक करतांना मिळुन आले. त्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ.सूरज पाटील, पोना. यासिन पिंजारी,रमण सुरळकर अशांनी मिळून केली.