• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

यावल तालुक्यात महापुरूषांच्या फलकाची विटबंना !

पोलीस प्रशासनाकडून शांततेचे आवाहन

editor desk by editor desk
April 16, 2023
in क्राईम, भुसावळ
0
यावल तालुक्यात महापुरूषांच्या फलकाची विटबंना !

भुसावळ : प्रतिनिधी 

जिल्ह्यातील एका गावात फलकावरील थोर महापुरुषांच्या प्रतिमेची अज्ञात समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर गावातील तणावाचे वातावसरण निर्माण झाले होते. घटना स्थळी तत्काळ पोलीस प्रशासन दाखल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील थोर महापुरुषांच्या प्रतिमेची अज्ञात समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर गावातील तणावाचे वातावसरण निर्माण झाले. याबाबतची माहिती कळताच मिळताच फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, यावल निरीक्षक राकेश माणगावकर यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनासह सरपंच अजय अडकमोल यांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले आहे. दरम्यान गावात गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून अधिकारी तळ ठोकून आहेत.
यावल तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकातील शुभेच्छा फलकावरील थोर पुरुषांच्या प्रतिमेची शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली. रविवारी सकाळी घटनेचे वृत्त गावात कळताच मोठ्या संख्येने जमाव मुख्य चौकात जमला. यावेळी सुमारे तीन तास पोलीस चौकी समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी प्रशासनाच्या वतीने थोर पुरुषाच्या प्रतिमेचे शुद्धीकरण केले. याप्रसंगी सरपंच अजय अडकमोल, विलास अडकमोल यांच्यासह नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून चोपडा आणि विविध ठिकाणावर दंगा नियंत्रण पथकासह स्थानिक पोलीस अधिकारी फौजदार अविनाश दहिफळे, सुनील मोरे, सुनीता कोळपकर यांच्यासह पोलीस ताफा तैनात आहे. दरम्यान पोलिसांनी पाच संशयीतांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक डॉक्टर सोनवणे यांनी दिली. तणावपूर्ण वातावरण असल्याने यावल-दहिगाव-सावखेडा बस सेवा सकाळपासून बंद होती. दरम्यान, निळे निशाण संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर, विष्णू पारधे, यांनी भेट देऊन शांतता राखण्याचे आवाहन केले.

Previous Post

जनता पुन्हा चुलीकडे ; गॅस सिंलिडरवर वर्षभरात झाली इतकी दरवाढ !

Next Post

जळगाव गुन्हे शाखेची कारवाई : व्यावसायिकाच्या घरातून लाखो रुपयाचा गुटखा जप्त !

Next Post
जळगाव गुन्हे शाखेची कारवाई : व्यावसायिकाच्या घरातून लाखो रुपयाचा गुटखा जप्त !

जळगाव गुन्हे शाखेची कारवाई : व्यावसायिकाच्या घरातून लाखो रुपयाचा गुटखा जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !
क्राईम

खळबळजनक : सांडपाण्याच्या खड्ड्यामध्ये पडल्याने तरुणाचा मृत्यू !

June 9, 2025
मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !
राजकारण

मुंब्रा स्थानकादरम्यान मोठी दुर्घटना : शरद पवारांनी मांडले मत !

June 9, 2025
क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !
क्रिंडा

क्रिकेट विश्वातील मोठी बातमी : बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय !

June 9, 2025
धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !
क्राईम

धावत्या लोकलमधून पडल्याने ६ प्रवासी ठार !

June 9, 2025
14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस
क्राईम

14 जूनपर्यंत तापमानात वाढ आणि काही ठिकाणीच मेघ गर्जनेसह पाऊस

June 9, 2025
निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !
एरंडोल

निसर्गाने साथ न दिल्याने तरुण शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 9, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group