भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील साकेगाव येथे भाडे तत्वावर राहत असलेल्या भाडेकरू तरुणांच्याा घरातून चोरट्यांनी मध्यरात्री पाच मोबाईलसह लॅपटॉप लांबविल्याची घटना बुधवार १२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
सविस्तर वृत्त असे कि, साकेगावातील रहिवासी असलेले नरसिंग काकडीया वसावे (वय २५) हे प्रमोद सोनवणे यांच्या मालकिच्या घरात भाडेकरू आहेत. शिवाय त्यांच्यासोबत अन्य तरुण शिक्षणानिमित्त भाडे तत्वाने राहतात. बुधवारी रात्री वसावे यांना झोप लागल्यानंतर त्यांना दरवाजाची कडी लावण्याचा विसर पडल्याने चोरट्याने घरात प्रवेश करीत 42 हजार रुपये किंमतीचे पाच मोबाईल, 18 हजार रुपये किंमतीचे लॅपटॉप लांबवला. सकाळी झोपेतून उठल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर वसावे यांनी भुसावळ तालुका पोलिसात धाव घेत अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार नोंदवली. तपास हवालदार वाल्मीक सोनवणे करीत आहेत.