भुसावळ : प्रतिनिधी
महिलेच्या मोबाईलमधे काढलेले फोटो पतीला दाखवण्याची धमकी देत विवाहित महिलेचे फोटो स्टेट्सला ठेवल्याने विवाहीतेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ तालुक्यातील एका गावात २९ वर्षीय विवाहिता मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. या घटनेतील संशयित आरोपी कैलास तायडे याने विवाहीतेकडून वेळोवेळी काही रक्कम उधार घेतली होती. दरम्यानच्या कालावधीत त्याने आपल्या मोबाईलमधे तिचे फोटो काढले होते. विवाहीतेने आपल्याला वेळोवेळी उधार दिलेली रक्कम पुन्हा मागू नये यासाठी त्याने मोबाईलमधे काढलेल्या फोटोचा आधार घेतला असे विवाहीतेचे म्हणणे आहे. ते फोटो आपल्या पतीला दाखवण्याची धमकी कैलासने दिली असा विवाहीतेचा कैलासवर आरोप आहे. कैलासने संबंधीत विवाहीतेला फोन करुन घरात बोलावून बंद दाराआड तसेच रस्ता अडवून काढलेले फोटो मोबाईल व्हाटस अॅप स्टेटसला ठेवले. गेल्या अडीच महिन्यापासून दोघांमधे परिचय झाला असून आता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे बदनामी झाल्यासह विविध आरोपाखाली भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हे.कॉ. संजय भोई करत आहेत.