जळगाव : प्रतिनिधी
शहराच्या तापमानाने यंदा पहिल्यांदा चाळिशी पार केली असून, बुधवारी जळगाव शहराचे तापमान राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होते. ४१.६ अंश अशी तापमानाची नोंद झाली. बुधवारी राज्यात चंद्रपूर शहरात सर्वाधिक ४१.८ अंश तापमान होते. धुळ्याच्याही तापमानाने बुधवारी ४० चा टप्पा ओलांडला आहे.
जळगाव शहराच्या किमान तापमानातदेखील वाढ झाली असून, मंगळवारी रात्रीचे तापमान २५ अंशांवर होते. तर बुधवारी रात्रीचे तापमान २७ अंशांवर पोहोचले होते. राज्यातील रात्रीच्या सर्वात जास्त तापमानाची नोंद जळगाव शहरात झाली आहे.