एरंडोल : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावातील २८ वर्षीय तरुणीवर एकाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कासोदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती कि, एरांडोल तालुक्यातील एका गावात एका २८ वर्षीय तरुणी वास्तव्यास आहे. एका २८ वर्षीय तरुणाने २०२१ पासून तील तिला वारवार माझे तुझ्यावर प्रेम आहे सांगून मी तुझ्याशी लग्न करेल म्हणत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला आहे. तिच्यावर नेहमी त्याच्या घरी अत्याचार केला त्यानंतर फिर्यादी तरुणीने त्याला टाळण्याचा प्रयत्न केला असता त्याने दि १२ डिसेंबर २०२२ रोजी तरुणीला भररस्त्यावर हात पकडून त्याच्या घरी घेवून जात पुन्हा जबरदस्तीने अत्याचार केला या प्रकरणी २८ वर्षीय तरुणीने कासोदा पोलिसात धाव घेत संशयित आरोपी मनोहर बापू पाटील (वय २८) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सपोनि नीता कायटे हे करीत आहेत. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे.