अमळनेर : प्रतिनिधी
शहरातील बस स्थानकावर एका महिलेच्या पर्स मधील २६ हजार रुपयांचे दागिन्यासह रोकड लंपास झाल्याची घटना उघडकीस आल्याने अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शिरूड परिसरातील रहिवासी असलेल्या जयश्री निलेश सूर्यवंशी हे दि ६ रोजी कल्याण – रावेर बसने अमळनेर शहरातील बस स्थानकावर दुपारी ३.२५ वाजेच्या सुमारास आले असता ते अमळनेर येथे उतरत असतांना त्यांनी त्यांची पर्सची पाहणी केली असतात पर्समध्ये ठेवलेला २५ हजार रुपये किमतीचा सोन्याचा नेकलेस व ५०० रुपये रोकड अनोळखी चोरट्यांनी लंपास केल्याचे उघडकीस येताच त्यांनी तत्काळ अमळनेर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉ.चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.