Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ट्रान्सजेंडर पुरुष देणार प्रथमच बाळाला जन्म !
    आरोग्य

    ट्रान्सजेंडर पुरुष देणार प्रथमच बाळाला जन्म !

    editor deskBy editor deskFebruary 4, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

    एक ट्रान्सजेंडर कपल आई-वडील बनणार हे देशातील पहिलीच घटना आहे. हि घटना केरळच्या कोझिकोडमधील घडली असून या दाम्पत्याने आपण पुढील महिन्यात म्हणजे मार्चमध्ये एका मुलाला जन्म देणार असल्याची घोषणा केली आहे. एक ट्रान्सजेंडर व्यक्ती बाळंत होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. गत 3 वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या जिहाद व जिया पावलने ही आनंदाची बातमी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे.

    जिया पावल एक डांसर आहे. ती पुरुष म्हणून जन्माला आली व एका महिलेत तिचे रुपांतर झाले. तर जहाद एक महिला म्हणून जन्माला आली आणि नंतर ती पुरुष झाली. जहादने गरोदर होण्यासाठी स्वतःची ट्राझिशनिंग प्रोसेस बंद केली आहे.
    ‘आम्ही आई बनण्याचे माझे व वडील बनण्याचे माझ्या पार्टनरचे स्वप्न साकार करणार आहोत. 8 महिन्यांचा गर्भ आता जहादच्या पोटात आहे. मी जन्माने किंवा आपल्या शरीराने केव्हाच एक महिला नव्हते. पण आपल्याला कुणीतरी आई म्हणावे असे माझे स्वप्न होते. आम्ही एकत्र येऊन 3 वर्षे झालेत. माझ्या आई बनण्यासह जहादचे वडील बनण्याचे स्वप्न आहे. आज 8 महिन्यांचे जीवन त्याच्या मर्जीने त्याच्या पोटात वाढत आहे.’
    जियाने सांगितले – आम्ही एकत्र राहण्यास सुरुवात केली, तेव्हा आम्ही आमचे जीवन अन्य ट्रान्सजेंडर्सपेक्षा वेगळे असावे असा निश्चय केला. बहुतांश ट्रान्सजेंडर कपलचा समाज व त्यांचे कुटुंबीय बहिष्कार करतात. या जगातील आपले अस्तित्व संपल्यानंतरही आपले कुणीतरी असावे यासाठी आम्हाला एक मूल हवे होते. आम्ही बाळ जन्माला घालण्याचा निर्णय घेतला तेव्हा, जहादची ब्रेस्ट रिमूव्हल सर्जरी सुरू होती. आम्ही ती गरोदरपणासाठी थांबवली.

    स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, या दाम्पत्याने एक मूल दत्तक घेण्याचाही विचार केला. त्यांनी त्याची प्रक्रियाही जाणून घेतली. पण कायदेशीर अडचणींमुळे त्यांना ते जमले नाही. यामुळे त्यांनी स्वतःचेच मूल जन्माला घालण्याचा निर्णय घेतला.
    जियाने आपल्या कुटुंबासह डॉक्टरांचे आभार मानलेत. जहाद मुलाला जन्म दिल्यानंतर पुरुष बनण्याची प्रोसेस पुन्हा सुरू करेल. जिया म्हणाली – जहादने दोन्ही स्तन काढून टाकलेत. त्यामुळे आम्ही आमच्या बाळाला मेडिकल कॉलेजमध्ये मिळणारे ब्रेस्ट मिल्क बँकेतील दूध देण्याचा प्रयत्न करू.

    या जोडप्याच्या इंस्टाग्राम पोस्टला हजारो लाइक्स व कमेंट्स मिळाल्यात. अनेकजण त्यांना शुभेच्छाही देत आहेत. इंटरनेट युजर्स त्यांच्या उज्ज्वल भविष्याचीही कामना करत आहेत. एकजण म्हणाला -अभिनंदन. आज इंस्टाग्रामवर पाहिलेली ही सर्वात सुंदर गोष्ट आहे. निर्मळ प्रेमाला कोणतीही मर्यादा नसते. तुम्हाला आणखी ताकद मिळो. अन्य एक युजर म्हणाला – हे खूप सुंदर आहे. गॉडफॉर्सेन नॉर्म्स तोडण्यासाठी धन्यवाद. तुमचे बाळ ठणठणीत होवो, खूप शुभेच्छा. दुसरा एक युजर म्हणाला – अभिनंदन. आनंदी राहा, खूप जगा. देव तुमच्यासोबत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महाराष्ट्र राज्यसभा रणभूमी: महायुती- महाविकास आघाडीमध्ये प्रत्येकी ताण वाढला

    February 25, 2026

    मराठा आरक्षणासाठी सरकारवर दबाव; जरांगे पाटलांकडून उपोषणाचा इशारा !

    February 25, 2026

    मालेगाव मनपाच्या विद्युत विभागात सामूहिक नमाज ;राजकीय वाद पेटणार !

    February 25, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.