Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पतीने नवरीसारखी नेसली साडी : पत्नीचा धक्कादायक खुलासा
    क्राईम

    पतीने नवरीसारखी नेसली साडी : पत्नीचा धक्कादायक खुलासा

    editor deskBy editor deskFebruary 4, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    त्याच्या परिवाराने धुमधडाक्यात त्याचं लग्न केलं. पण लग्नाचा आणि सुखी संसाराचा हा आनंद फार काळ टिकला नाही. आता महिलेने आरोप केला आहे की, तिचा पती महिलांसारखा मेकअप करतो. अशी एक हैराण करणारी घटना मुंबईमधून समोर आली आहे. इथे एका पत्नीने तिच्या पतीबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. घाटकोपरला राहणाऱ्या या महिलेने सांगितलं की, 2021 मध्ये कोल्हापूरला राहणाऱ्या एका तरूणासोबत तिचं लग्न झालं होतं.

    महिलेचा आरोप आहे की, एका रात्री तिने पाहिलं की, तिच्या पतीने नवरीसारखी साडी नेसली, इतकंच नाही तर त्याने नवरीसारखं मेकअप केलं. ही साडी महिलेने लग्नात घेतली होती. रात्री तो तसाच झोपला. दुसऱ्या दिवशी तिने ही घटना सासूला सांगितली तर सासू म्हणाली की, ही त्याची जुनी सवय आहे.

    महिलेचा आरोप आहे की, याबाबत तिने तिच्या माहेरच्या लोकांना सांगितलं. जेव्हा हे पती आणि सासरच्या लोकांना समजलं तेव्हा त्यांनी तिला त्रास देणं सुरू केलं. महिला म्हणाली की, सासरच्या लोकांनी पतीच्या वागण्यावर पडदा टाकण्यासाठी ती प्रेग्नेंट असल्याची अफवा पसरवली. नंतर असंही सांगण्यात आलं की, काळजी न घेतल्यामुळे तिचा गर्भपात झाला. जेव्हा तिने याबाबत पतीकडे तक्रार केली तर तिला मारहाण करण्यात आली. महिला म्हणाली की, माहेरी काही दिवस राहिल्यानंतर ती कोल्हापूरला परत आली. पीडितेचा आरोप आहे की, सासरी आल्यानंतर तिने सदर बाजार पोलिसांना संपर्क केला. पण तिची कोणतीही तक्रार लिहून घेण्यात आली नाही. कारण सासरचे लोक खूप श्रीमंत आहेत. तेच पीडितेच्या परिवाराने सांगितलं की, त्यांच्या मुलीला त्रास देण्यात आला आहे. आरोपींना कठोर शिक्षा मिळली पाहिजे. ते म्हणाले की, आम्ही फार आनंदाने आमच्या मुलीचं लग्न केलं होतं. आम्ही मुलालाही भेटलो होतो. पण त्यावेळी काही संशयास्पद वाटलं नाही. तेच सासरच्या लोकांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026

    ‘त्या’ पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक उपनिरीक्षक आले पोलिसांना शरण !

    March 10, 2026

    २२ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.