जळगाव : प्रतिनिधी
शहरातील एका परिसरातून भरदिवसा चारचाकीच्या बोनेटवर ठेवलेली महिलेची पर्स चोरी झाली आहे. यात महिलेचे तब्बल ४ लाख ३७ हजाराचा मुदेमाल लंपास झाला असून या प्रकरणी शनिपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी कि, शहरातील तळेले कॉलनीतील रहिवासी असलेल्या मनीषा पाटील (वय ४२) या दि २८ रोजी दुपारच्या सुमारास त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या चारचाकीच्या बोनेटवर ठेवलेली पर्स अनोळखी चोरट्यांनी घेवून पसार झाले आहे. या पर्समध्ये तब्बल ३ लाख ८७ हजाराचे सोने व चांदीचे दागिने तर १० हजार रुपये किमतीचा मोबाईल यासह ४० हजार रुपये रोकड त्यासोबत चारचाकी गाडीचे आर.सीबुक यासह महत्वाची कागदपत्र चोरून नेले आहे. या प्रकरणी मनीषा पाटील यांनी शनिपेठ पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप चांदेलकर हे करीत आहेत.