पारोळा प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील कराडी गावाजवळ रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या चौघांनी कारला अडवून धुळे येथील व्यापाऱ्याची सुमारे ६ लाख ९५ हजार रुपयाची रोकड लांबवल्याची घटना पारोळा तालुक्यात घडली. याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोळा तालुक्यातील कराडी गावाजवळ धुळे येथील व्यापारी योगेश वाल्मीक पाटील (रा. निमडाळे ता. जि. धुळे) या व्यापाऱ्याने पारोळा पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. ते स्वीफ्ट डिझायर कार एमएच ०१ बीटी ८७९६ ने तामसवाडी ता. पारोळा येथे शेतक-याची कापसाची उधारी देण्यासाठी पैसे घेऊन निघाले होते. कराडी गावाचे अलीकडे १ कि.मी अंतरावर दोन विना क्रमांकाचे दुचाकीवरील ४ इसमांनी कारचे पुढील बाजुस व मागून येऊन कार…
Author: user
रावेर प्रतिनिधी । पातोंडी गावाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला कट मारून झालेल्या अपघातात वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार ९ जून रोजी सकाळी साडेअकरा वाजता घडली आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. चुडामन लहानू भालेराव वय-६० रा. कर्जोत ता. रावेर असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील पातोंडी गावाजवळ रविवार ९ जून रोजी सकाळी १०.३० वाजता अजय अशोक शिरतुरे वय-३० रा. विवरा ता.रावेर हा त्याची दुचाकी एमएच १९ इडी ७५९२ निंभोरा सिमकडे जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत चुडामन लहानू भालेराव हे देखील दुचाकीवर मागे बसलेले होते. दरम्यान…
अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील पडसे गावाजवळ धावत्या रेल्वेच्या धक्का लागल्याने एका अनोळखी अंदाजे ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवार ९ जून रोजी सकाळी ८ वाजता सुमारास उघडकीला आले आहे. याबाबत दुपारी १ वाजता मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या संदर्भात अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील पडसे गावाजवळ असलेल्या रेल्वे रुळावरील रेल्वे खंबा क्रमांक ३३४ आणि २३४ च्या मध्ये असलेल्या रेल्वे रुळात एका अनोळखी अंदाजे ३५ वर्षे तरुणाचा मृतदेह आढळून आला. दरम्यान कोणत्यातरी धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने तरूणाचा त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या संदर्भात लोको पायलट यांनी मारवड पोलिसात…
पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड येथील शेतकऱ्यांच्या गोलबर्डी शिवारातील शेतात वीज कोसळल्याने बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना उघडकीला आले आहे. या घटनेत शेतकऱ्याचे ३५ हजारांचे नुकसान झाले आहे. दरम्यान घटनेत थोड्याच अंतरावर असलेले शेतकरी कुटुंब सुदैवाने बचावले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द येथील शेतकरी काशीनाथ दौलत पाटील यांची शेतजमीन गोलबर्डी शिवारात असून त्यांनी याच शेतात शेती अवजारे व गुरेढोरे बांधण्याची व्यवस्था केली आहे. काल ०९ जून २०२४ रविवार रोजी शेतात काम करत असतांनाच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. वादळीवाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती. म्हणून त्यांनी लवकरात, लवकर कामकाज आटोपून सायंकाळी साडेसहा वाजता बैलजोडी बांधून…
जळगाव प्रतिनिधी । टॉवर चौकातील हॉटेल जोगळेकर येथे नाश्त्याचे पैसे मागितल्याचा राग आल्याने दारुच्या नशेत असलेल्या दोघांनी हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करीत नुकसान केल्याची घटना रविवारी ९ रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सायंकाळी ७ वाजता दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरताील नवीपेठ परिसरात हॉटेल जोगळेकर येथे विजय काशीनाथ रावकर हे मॅनेजर म्हणून नोकरीस आहेत. रविवारी ९ रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास अजय जगताप व प्रवीण शिंदे हे दारु पिवून हॉटेलमध्ये आले. त्यांनी नाश्त्याचे पार्सल घेतल्यानंतर पैसे न देता त्यांनी मालक मयुर व्यास यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची…
जळगाव प्रतिनिधी । शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून अधिक नफा मिळवून देण्याचे अमिष दाखवत खासगी नोकरदार असलेले चेतन विनायक नेहेते (वय-३६, रा. राजोरे, ता. यावल) यांची २६ लाख ७४ हजार रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रविवार, ९ जून रोजी दुपारी ४ वाजता सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक असे की, १० मार्च ते ६ जून या दरम्यान अज्ञात दोन जणांनी चेतन नेहेते यांच्याशी संपर्क साधून व्हाटस् ॲप ग्रुप व टेलिग्रामला जॉईन होण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना टेलिग्रामवर एक लिंक पाठवून पोर्टलवर नोंदणी करायला लावली. त्यांना मार्गदर्शन करीत त्यांचा विश्वास संपादन केला…
चाळीसगाव प्रतिनिधी । ठाणे व कल्याण येथून चोरी केलेल्या दोन दुचाकी हे चाळीसगाव शहरातील बाजार मार्केट कमिटी परिसरात विक्रीसाठी आणलेल्या दोन संशयित आरोपींना चाळीसगाव शहर पोलीसांनी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक असे की, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार चाळीसगाव शहर पोलीसांच्या वतीने शहरात पेट्रोलिंग करत असतांना चाळीसगाव राबविण्यात आली. त्यावेळी बेलखेडा ता. कन्नड येथील दोनजण हे चोरीच्या दोन दुचाकी बाजार मार्केट कमिटी परीसरात विक्री करीता येणार असल्याची गोपनिय माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस…
जळगाव प्रतिनिधी । यंदाचा उन्हाळा अतिशय कडक होता. यंदा मे महिन्यात सलग पाच दिवस ४५ अंशांपेक्षा अधिक तापमान होते. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वच जण अती तापमानाने हैराण झाले होते. त्याचा फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. केळी उत्पादकांना अती तापमानात जर सलग तीन दिवस ४५ अंश तापमान राहिले तर त्यांना नुकसान भरपाई शासन देते. यंदा तापमानाच्या निकषात जिल्ह्यातील ५१ महसूल मंडळे पात्र ठरली आहे. सलग पाच दिवस ४५ अंश तापमान राहिल्यामुळे ५१ महसूल मंडळातील केळी उत्पादक शेतकरी ४३ हजार ५०० रुपयांच्या नुकसान भरपाईच्या रक्कमेसाठी पात्र ठरले आहेत. या आधी एप्रिल महिन्याच्या जास्त तापमानाच्या निकषात ७५ महसूल मंडळ पात्र ठरले होते.…
पारोळा प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील मुंदाणे शिवारातील शेतात असलेल्या १० ते १५ शेतकऱ्यांचे शेततळ्यातील प्लास्टिक पेपर फाडून चोरून नेत शेतकऱ्याचे ४० हजारांचे नुकसान केल्याची २ जून रोजी सकाळी उघडकीला आले आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील मुंदाणे येथे अभिमान पुंडलिक पाटील वय-६५ हे शेतकरी वास्तव्याला आहे. त्यांचे मुंडाणे शिवारातील शेत गट नंबर 102 मध्ये शेत आहे. या शेतात ते पिकांना पाणी देण्यासाठी शेततळे बनविले आहे. या शेततळ्यात प्लास्टिक पेपरचा वापर केलेला आहे. दरम्यान १ जून रोजी सायंकाळी ६ ते २ जून सकाळी ८ वाजेच्या दरम्यान…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील सिंधी कॉलनी रस्त्यावर एकाचा मानेवर धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांनी गर्दी केली होती. जळगाव शहरातील नाथ वाडा परिसरात राहणारे ललित प्रल्हाद वाणी वय-४५ हे सुप्रीम कंपनी गाडेगाव येथे कामाला आहेत. रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास कामावरून ते घरी येत असताना सिंधी कॉलनी ते नाथवाडा रस्त्याने ते घरी येत होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेर वाळूवर त्यांचा मृतदेह मिळून आला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने धाव घेतली. मयत ललित वाणी यांच्या पश्चात…

