जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील सामजिक कार्यकर्ते अमित पाटील यांचे वडील सेवानिवृत्त टेलिफोन ऑपरेटर एकनाथ रामदास पाटील (वय 75, रा. साळवा, ता. धरणगाव, ह. मु. जळगाव) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून एकनाथ पाटील हे आजारी होते. आज त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते सामाजिक कार्यकर्ते अमित पाटील यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगी, मुलगा,सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा आज शनिवारी 28 रोजी दुपारी 3 वाजता राहते घर महाबळ कॉलनी च्या खाली संभाजीनगर चौक (डॉ. राहुल पाटील यांच्या घरासमोर) येथून निघणार असून नेरी नाका समशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
Author: user
जळगाव प्रतिनिधी । जळगाव, शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाची आज मंगळवारी २४ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता मुंबईत मातोश्रीवर महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत जळगाव जिल्ह्यातील जागा निश्चित व उमेदवारांवर चर्चा होणार आहे. या बैठकीकडे संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांचे लक्ष लागून आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, संपर्कप्रमुख संजय सावंत, शिवसेना नेते उमेश पाटील, जिल्हाप्रमुख हर्षल माने विष्णू भंगाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आले आहे. जळगाव ग्रामीण, जळगाव शहर, चाळीसगाव, चोपडा, पाचोरा या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार होते. त्यानंतर शिंदे गटात या आमदारांनी प्रवेश केला, यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचा या जागांसाठी मोठ्या प्रमाणात आग्रह…
जळगाव प्रतिनिधी | मित्रांसोबत शेतातील विहिरीत होण्यासाठी गेलेल्या एका 25 वर्षे तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी 29 जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. महेंद्र नारायण पाटील वय-25 रा. लोणवाडी ता.जळगाव असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. जळगाव तालुक्यातील लोणवाडी येथील महेंद्र पाटील हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. गुरुवारी 29 जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास महेंद्र हा त्याच्या मित्रांसोबत लोणवाडी गावातील शेतामध्ये विहिरीत पोहतांना पाण्याचा अंदाज न आल्यान सुमारे ७० फुट खोल असलेल्या विहिरीत दुपारी १:३०च्या सुमारास बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कर्मचारी पो. हे.कॉ.प्रदीप पाटील व पो.हे.कॉ.स्वप्नील…
जळगाव प्रतिनिधी | जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या रिक्त असलेल्या पोलिस निरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार आता एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील हे ३१ मे रोजी निवृत्त झाले. हे पद रिक्त झाल्यामुळे अतिरिक्त पदभार जळगाव सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे देण्यात आला होता.त्यानंतर आता बुधवार, १२ जून रोजी हा पदभार एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे देण्यात आला आहे.शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीमुळे आचारसंहिता काळात एलसीबीच्या प्रमुखपदाची नियुक्ती थांबली आहे.
जळगाव प्रतिनिधी | जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा गावात राहणाऱ्या एका ६ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवार ११ जून रोजी रात्री ११ वाजता समोर आली आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा येथे ६ वर्षे चिमुकली आपले आईवडील, दोन बहिणी, एक भाऊ यांच्यासोबत वास्तव्याला होती. दरम्यान गावात राहणारा एकाने याने पीडित मुलीला तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवत तिला मंगळवार ११ जून रोजी सायंकाळी ४ वाजता गावापासून जवळ असलेल्या चिंचखेडा शिवारातील शेतात घेऊन गेला. त्यावर त्या ठिकाणी पीडित मुलीवर अत्याचार केला आणि तिचा गळा दाबून खून केला. दुसरीकडे दुपारी ४ वाजेपासून मुलगी बेपत्ता…
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश ! जळगाव प्रतिनिधी | पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून बुधवारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार, हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत विमा काढला आहे. अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मध्ये वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 1. हिवाळ्यातील कमी तापमानाचा निकषात केळी उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास, आता हेक्टरी 32 हजार 179 रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. आधीच्या निकषात ही भरपाईची रक्कम 26 हजार 500 इतकी होती. 2. एप्रिल महिन्यातील जास्त तापमानाचा निकषात पात्र झालेला शेतकऱ्यांना आता हेक्टरी 42 हजार 500 रुपयांची नुकसान भरपाई…
जळगाव प्रतिनिधी |रावेर तालुक्यात तक्रारदार व्यक्तीचे वाहन निंभोरा पोलीस स्टेशन येथे जप्त झाले होते. निंभोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कैलास ठाकूर यांनी वाहन सोडण्यासाठी तक्रारदाराला १५ हजारांची लाच मागितली. अखेर तडजोडीअंती १० हजार रुपये स्वीकारताना पोलीस अधिकाऱ्याला दुपारी १२ जून रोजी दुपारी ३ वाजता रंगेहात पकडले आहे. ही कारवाई जळगाव एसीबीने केली आहे. कैलास ठाकूर (वय ४०, रा. निंभोरा ता. रावेर) असे अटक केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. ते निंभोरा पोलीस स्टेशनला नियुक्त होते. सुमारे चार महिन्यांपूर्वी एका वाहनावर गुटख्याची कारवाई करण्यात आली होती. त्यातील वाहन जप्त करण्यात आले होते. हे वाहन सोडविण्यासाठी तक्रारदाराने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने तक्रारदाराला…
चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील बसस्थानक महिलेच्या पर्समधून ४० हजारांची रोकड आणि महत्वाची कागदपत्रे चोरून नेल्याची घटना १० जून रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी ११ जून रोजी दुपारी १२ वाजता चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वंदना गोरख राठोड वय ३८ रा. पाटणा ता. चाळीसगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. सोमवारी १० जून रोजी महिला चाळीसगाव शहरात आलेल्या होत्या. दुपारी ४ वाजता पाटणा येथे जाण्यासाठी चाळीसगाव बसस्थानकात आलेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले ४० हजारांची रोकड आणि महत्वाची कागदपत्रे असा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान पर्समधून रोकड ची चोरी झाल्याचे…
भुसावळ प्रतिनिधी | शहरातील जुना सातारा भागातील कोळीवाडा परिसरातील ४२ वर्षीय तरुणाने आजाराला कंटाळून तापी नदीपात्रात उडी घेत आत्महत्या केली. ही घटना सोमवार दि. १० जून रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. भुसावळ शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. योगेश जगदीश सपकाळे (वय ४२, जुना सातारा, कोळीवाडा, भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे. योगेश सपकाळे हे गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सर आजाराने त्रस्त होते व या आजाराला कंटाळून त्यांनी सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तापी नदीपात्रात उडी घेतली. खडकावर आपटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती नातेवाईकांनी दिली. तापी पात्रात आत्महत्या केल्याची माहिती कळताच तापी पुलावर मोठ्या प्रमाणावर…
जळगाव प्रतिनिधी । पाणीपुरवठा व स्वछता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक हेमंत उर्फ बंडू नारखेडे यांची अखिल महाराष्ट्र लेवा महासंघाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांच्या या निवडीबद्दल समाजातील सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. आगामी काळात लेवा महासंघाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपस्करम राबविणार असून समाजाच्या प्रगतीसाठी झटणार असल्याचा मनोदय हेमंत नारखेडे यांनी व्यक्त केला आहे.

