जळगाव;- महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा जळगाव जिल्हापुर्वचे अध्यक्ष प्रशांत सुरेश सुरळकर यांची नाशिक विभाग तेली समाजाच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा या संस्थेच्या नावात बदल झाला असून प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्य असे नामकरण करण्यात आले आहे. प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र राज्याचे प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी यांनी प्रशांत सुरेश सुरळकर यांना प्रदेश तेली युवक महासंघ नाशिक विभागाच्या कार्याध्यक्ष या पदावर नियुक्तीपत्र देऊन अभिनंदन केले. माजी मंत्री आणि तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर यांचे आदेशानुसार तसेच माजी खासदार सुरेश वाघमारे , विक्रांत चांदवडकर, प्रदेश महासचिव ज्ञानेश्वर दुर्गुळे, विजय काळे ,महिलाअध्यक्ष सौ संध्याताई सव्वालाखे, प्रदेश…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
टोकियो (वृत्तसंस्था ) ;-ऑलिम्पिकमधील भालाफेक स्पर्धेत भारताचा अव्वल खेळाडू नीरज चोप्रा याने अंतिम शानदार कामगिरी करताना सुवर्णपदकाची कमाई केली. त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारताचा सुवर्णपदकाचा 12 वर्षांचा दुष्काळ समाप्त झाला आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारतीयांच्या माना उंचावल्या आहेत. नीरजने अंतिम फेरीत पहिला थ्रो 87.03 आणि दुसरा थ्रो 87.58 मीटर भालाफेक करून सुवर्णपदकावर नाव कोरलं. ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तीक सुवर्णपदक मिळवणारा नीरज दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी नेमबाजीत 10 मीटर एअप रायपल प्रकारात 2008 मध्ये अभिनव बिंद्रा याने सुवर्णपदक पटकावले होते. भालाफेक प्रकारात पदक जिंकणारा नीराज पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. याआधी अ गटातील पात्रता फेरीतील कामगिरीच्या निकषावर नीरजला थेट अंतिम…
जळगाव,;- मौजे निंभोरा, ता. धरणगाव येथील रहिवाशी भागवत भिका पाटील यांचा शेतातून घरी परत येत असताना निंभोरे लगत खैऱ्या नाल्याला अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याने 17 जुलै, 2021 रोजी मयत झाले. शासनाच्या नैसर्गिक आपत्ती योजनेअंतर्गत स्व. भागवत पाटील यांच्या वारस पत्नी श्रीमती मालुबाई भागवत पाटील यांना चार लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पं. स. सभापती प्रेमराज पाटील, माजी उपसभापती डी.ओ. पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, तहसीलदार नितीनकुमार देवरे, जिल्हा परिषद सदस्य गोपाल चौधरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
वर्ड व्हिजन इंडियाचा उपक्रम धरणगाव (प्रतिनिधी ) – येथील तालुक्यातील असलेली पोखरी तांडा या गावात मागील बऱ्याच वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या जाणवत होती होती. ग्रामस्थ शेतातील पाणी हंड्यात भरून स्वतः डोक्यावर वाहत घरी आणत. हे पाणी खाजगी विहीर आणि खाजगी बोअरवेल मधून आणत असत. पाणी लांब अंतरावरून आणत असल्यामुळे दिवसाचा बराच वेळ पाणी वाहण्यात जात असे म्हणून रोजगाराची देखील समस्या निर्माण झाली होती. वर्ल्ड व्हिजन इंडिया मागील दोन वर्षांपासून या गावांमधे गरीब कुटुंबांतील मुलांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी विविध कार्यक्रम हाती घेवून राबवत आहे. मुलांच्या आरोग्यासाठी विविध कार्यक्रम जसे, पोषण आहार, मुलांची सुरक्षा विषयी जनजागृती, महिला सबलीकणासाठी आणि कोविड १९…
जळगाव (प्रतिनिधी ) ;- शहरातील शिवाजी नगर भागात असणाऱ्या जुन्या कानळदा जकात नाका तोडण्यासाठी मनपाचे जेसीबी आणि ट्रॅक्टर घेऊन गेलेल्या नगरसेवकाला अवैध व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत शहर पोलीस स्टेशनला नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी तक्रार केली आहे. शिवाजी नगरातील नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी जुन्या कानळदा जकात नाक्यावर अवैध दारू विक्री तसेच महिलांची छेडखानी होत असल्याचे प्रकार घडत असल्याने हा जकात नाका तोडण्यात यावा अशी मनपाकडे वेळोवेळी तक्रार आणि मागणी केली होती. त्यामुळे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी आज मनपाचे बुलडोझर घेऊन कानळदा जकात नाका पाडण्यासाठी आले असता त्यांना भोई नामक व्यक्तीने दमदाटी…
जळगाव (प्रतिनिधी ) ;- रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा, हे ब्रिद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून ‘राष्ट्रवादी वैद्यकीय सहाय्यता कक्ष’ सुरु करण्यात येत आहे. विविध शासकीय वैद्यकीय योजना तसेच दानशूर सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून आर्थिक अडचणीतील गरजू रुग्णांना व अंपगांना मदत मिळवून देण्याचे काम या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही रुग्णाचे उपचार थांबू नयेत, तसेच त्यांना योग्य उपचार मिळावेत यासाठी हा कक्ष कार्यरत असेल. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री मा. राजेश टोपे आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांचेही मार्गदर्शन या कक्षाला लाभणार आहे. राज्यातील सर्व २८८…
नवी दिल्ली – देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर देण्यात येत आहे. देशभरात करोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक घट होत आहे. मात्र करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जात आहे. करोनाच्या या तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. सध्या तीन लस भारतात उपलब्ध आहेत. दरम्यान भारत सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला भारतातील वापराला मंजुरी दिली आहे.जॉन्सन अँड जॉन्स कंपनीने लशीच्या आपत्कालीन वापरासाठी भारताकडे मंजुरी मागितली होती. भारत सरकारने जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस लशीला भारतातील वापराला मंजुरी दिली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने ट्विट करुन दिली आहे. सध्या देशात कोव्हॅक्सिन व कोव्हिशिल्ड या दोन भारतीय लशींच्या व्यतिरिक्त…

