लाईव्ह महाराष्ट्र : गणेशोत्सव येत्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे या काळात उपद्रवी गुन्हेगारांनी काही करू नये म्हणून भुसावळ पोलिसांनी 35 प्रस्ताव सादर केलेल्या केले होते यापैकी 32 जणांना गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहर व तालुक्यात ९ ते २१ सप्टेंबर या काळात शहर व तालुका बंदीचे आदेश प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी काढले आहे. पोलीस प्रशासन आता नव्याने २१ जणांचे प्रस्ताव प्रलंबित असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. गणेशोत्सवास 10 सप्टेंबरपासून सुरूवात होत असून उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कोणीही गर्दी, गोंधळ करू नये, शहरबंदी, तालुका बंदीच्या आदेशाचे पालन न करणार्यांविरूध्द कायदेशीर कारवाई केली…
Author: टीम लाईव्ह महाराष्ट्र
लाईव्ह महाराष्ट्र :भडगाव तालुक्यातील कजगाव येथील तितूर नदीच्या उगमस्थानावर जोरदार पाऊस झाल्याने आठ दिवसांत दुसऱ्यांदा महापूर आला असून नदीकाठावरील जनावरे सुरक्षितस्थळी हलविण्यात आली. यामुळे कोणतेही हानी झालेली नाही. चाळीसगांव तालुका परिसरात आठ दिवसांनंतर दुसऱ्यांदा जोरदार पावसाने झोड़पल्याने महापुराचा सामना करावा लागत आहे. सकाळी चार वाजेच्या सुमारास तितुर नदीच्या पाण्याची पातळी वाढली. यावेळी देखील नदीपात्रातील पाणी गावात शिरल्याने जूनेगाव ते नवेगावातील मुख्य रस्ता बंद होऊन नागरीकांचा संपर्क तुटला होता. जवळपास पाच ते सात तास वाहतूक ठप्प झाली होती.भोरटेक, खाजोळा, पिप्री, वडगाव या गावांचा पुन्हा संपर्क तुटला आहे. या भागातील शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना मार्ग देखील बंद झाला आहे. दरम्यान ट्रान्सफॉर्मर पाण्याखाली आल्यामुळे…
लाईव्ह महाराष्ट्र : आगामी सार्वजनिक गणेशोत्सव शांततेमध्ये साजरा व्हावा यासाठी भुसावळ शहरांमध्ये पोलीस विभागाकडून ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले. यात एक तडीपार आरोपी त्याच्या कडील तलवार जप्त ,गुन्ह्यातील एक आरोपी तर एकाच्या घरातून दोन तलवारी जप्त करण्यात आल्या.भुसावळ उपविभागात ऑल आऊट ऑपरेशन मोहीम बाजारपेठ व भुसावळ शहर पोलीस यांनी संयुक्त कारवाई केली. आगामी सार्वजनिक गणेशोत्सव शांततेमध्ये साजरा व्हावा व या काळामध्ये समाजकंटकांवर वचक राहावा या दृष्टीने 7 च्या रात्री 10.00 ते 8 च्या पहाटे 3.00 पर्यंत भुसावळ शहरांमध्ये पोलीस विभागाकडून ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशन मध्ये 18 तडीपार आरोपी चेक करण्यात आले होते त्या पैकी हेमंत पैठणकर हा…
अमळनेर प्रतिनिधी : जानवे या गावात ग्रामपंचायत हे भ्रष्टाचाराचे कुरण ठरली आहे ज्या रस्त्याची पूर्णतः किंवा पूर्ण झाला नाही त्या रस्त्याची एम बी लिहण्यात येऊन बिल काढण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.यावरून ग्रामपंचायत मध्ये मोठ्या प्रमाणात भोंगळ कारभार सुरू असल्याचे उघड होत आहे .जानवे गावात सद्यःस्थितीला खूप अनागोंदी कारभार सुरू असून भ्रष्टाचाराचे कुरण झालेली आहे जानवे गावातील वार्ड क्र. २ मधील प्रकाश धुडकू पाटील ते विलास धोंडू पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याचे कामाची एम बी लिहण्यात आली आहे जेव्हा की प्रत्यक्षात हा रस्ता झालेला नाही तरी त्या रस्त्याची बिल (MB) लिहिले गेले आहे. कदाचित ठेकेदाराला पैसे मिळाले असतील ? वेळोवेळी लेखी तक्रार…
धरणगाव प्रतिनिधी : येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल येथे शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले . शाळेतील शिक्षकाचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेला शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे, शाखा व्यवस्थापक जगन गावित व माध्यमिक च्या मुख्याध्यापिका नाजनिन शेख यांच्या हस्ते माल्यार्पण व पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून नाजूका भदाणे यांनी शिक्षक दिनाचे महत्व व समाजाच्या जडणघडणीत शिक्षकाची भूमिका याचे महत्व सांगण्यात आले. शाळेच्या प्राचार्या, शाखा व्यवस्थापक यांच्यासह सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात…
लाईव्ह महाराष्ट्र: एरोडल तालुक्यातील अंजनी मध्यम प्रकल्प च्या क्षेत्रात पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणात पाण्याच्या पातळीत वाढ होऊं शकते अति वृष्टी झाल्यास पुराचे पाणी नदी पात्रात सोडण्यासाठी धरणाचे दरवाजे केव्हाही उघडून पुराचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येईल अंजनी धरणाचे खालील नदी काठावरील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेअंजनी मध्यम प्रकल्प एरंडोल ता. एरंडोल जि. जळगावअंजनी धरणाची सध्याची पाणी पातळी 52%असून धरण फक्त 4ते 5फूट खाली असून सायंकाळी अंजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु झालेला असल्याने धरणात 52% टक्के पाणीसाठा झालेला आहे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होतआहे, व हवामानखात्याच्या अंदाजा नुसार अति वृटीचा अंदाज असल्याने धरणाचे सुरक्षितेच्या दृष्टीने पुराचे पाणी नदी पात्रात…
तापी नदीकाठावरील व वाघूर नदीकाठारील नागरीकांना जिल्हा प्रशासनाचा सावधानतेचा इशाराजळगाव प्रतिनिधी: हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून धरणातील आवक सतत वाढत असल्याने सायंकाळपर्यंत धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे. असे कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांनी कळविले आहे. तर वाघुर धरणाचे पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणाची पाणी पातळी सातत्याने वाढत आहे. रात्रीपर्यंत वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग होऊ शकतो त्यामुळे तापी नदी व वाघूर नदी काठावरील गावातील नागरीकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून पूर्णा नदीलाही पूर येत आहे. त्यामुळे पाणी पातळी सतत वाढल्याने धरणातील…
जळगाव प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी बोदवड तालुक्याने आतापर्यंतचे सर्वात मोठे पाऊल उचलले आहे. महापौर, नगरसेवक, ४ पं.स सदस्य, व १ जी.प सदस्यांसह १३ जणांना पक्षाचा कार्यक्रम सोडून इतर पक्षाच्या कार्यक्रमांना उपस्थित दिलेल्यामुळे कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.दिलेल्या माहितीनुसार, आपण भारतीय जनता पार्टीचे चिन्हावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहात आणि आपण जाणून आहात मागील ६ महिन्यापासून आजतागत म्हणजेच मार्च २०२१ ते ऑगस्ट २०२१ पर्यंत भारतीय जनता पार्टी बोदवड तालुका व शहराच्या वतीने प्रदेशावरून आलेले अनेक समाजभिमुक व जनतेच्या हिताचे कार्यक्रम राबविन्यात आले. त्यात आपण यापैकी एकाही कार्यक्रमास जाहीर आव्हानानंतरही उपस्थितीत राहू शकला नाही. जे की पक्षचिन्हावर निवडणूक लढवून लोक- नियुक्त होऊन…
जळगाव प्रतिनिधी : जामनेर तालुक्यातील अनेक गावांना रात्री चक्रीवादळासह मुसळधार पावसाने झोडपले असून यामुळे मोठी हानी झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच चाळीसगाव तालुक्याला अतिवृष्टीचा फटका बसला होता. याच्या पाठोपाठ आता काल रात्री जामनेर तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले आहे. तालुक्यातील अनेक गावात अतिवृष्टी व चक्रीवादळामुळे भागदरा तोंडापूर ओझर या गावांमध्ये पावसाचे पाणी घुसले असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे शासन स्तरावर तात्काळ पाहणी करावी अशी मागणी होत आहे. तालुक्यातील ओझर गावांमध्ये सोमवार रोजी रात्रीच्या सुमारास चक्रीवादळ अतिवृष्टी झाली यामध्ये सुमारे ९० टक्के गावातील नागरिकांचे घरावरील पत्रे उडाले. घराची पडझड झाली. त्याचबरोबर संसार उपयोगी साहित्य यांचे मोठे नुकसान झाला…
जळगाव प्रतिनिधी : शेतक-यांचे ट्रक्टर ट्रॉली चोरून त्याच्या माध्यमातून वाळू वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिकगुन्हे शाखेला माहिती मिळाली असता पथकाने ट्रक्टर ट्रॉलीसह आरोपींना अटक केली.सध्या जळगांव जिल्हायात शेतक-यांचे ट्रक्टर व ट्रॉली चोरीचे प्रमाण वाढल्याने होते. शेतक-यांचे ट्रक्टर ट्रॉली चोरी होत असल्याने शेतकर्यांचे नुकसान होत होते.पो नि किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त बातमीदारा कडुनमिळाली की ,ट्रक्टर ट्रॉली चोर चोरून त्यामाध्यमातून ते वाळू वाहतूक करीत आहे त्याआधारे स.फौअशोक महाजन, पोहेकॉ विजयसिंग पाटील पोहेकॉ जितेंद्र पाटील ,पोहेकॉ अकरम शेख,पोहेकॉसुधाकर अंभोरे ,पोना नितीन बाविस्कर ,पोना प्रीतमपाटील ,पोना राहुल पाटील,पोना परेश महाजन, पोकॉ हरीष परदेशी ,पोहेकॉ भारत पाटील, पोहेकॉ विजयचौधरी याचे पथक तयार केले . …

