Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » १०,१२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी: संवेदनशील केंद्रांवर पूर्ण वेळ थांबणार भरारी पथके!
    जळगाव

    १०,१२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी: संवेदनशील केंद्रांवर पूर्ण वेळ थांबणार भरारी पथके!

    editor deskBy editor deskJanuary 17, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दि.२१ फेब्रुवारी ते २१ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा होणार आहे तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्चदरम्यान होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने दोन्ही परीक्षेदरम्यान संवेदनशील परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी-बारावाच्या परीक्षा होणार आहेत. २१ फेब्रुवारी ते २१ मार्चदरम्यान बारावीची परीक्षा होणार आहे तर दहावीची परीक्षा २ ते २५ मार्चदरम्यान होणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने यासाठी पूर्ण तयारी केली आहे. यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान होणार्‍या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य शिक्षण मंडळातर्फे कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे.

    सराव परीक्षा दिल्यावरच मिळणार अंतर्गत गुण

    बारावीच्या परीक्षांआधी औरंगाबाद शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या विभागांतर्गत येणार्‍या पाच जिल्ह्यांमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना आता सराव परीक्षा दिल्याशिवाय अंतर्गत गुण मिळणार नाहीत. बारावीच्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे. परीक्षेची भीती नाहीशी व्हावी, विद्यार्थ्यांचा मुख्य परीक्षेचा आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि लिखाणाचा सराव वाढवा या हेतून विभागीय शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा अनिवार्य केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण दिले जाणार आहेत.

    दहा कृती कार्यक्रमांची निवड

    शिक्षण मंडळाकडून लोकसहभागातून पहिल्यांदाच अशा प्रकारचा कृती कार्यक्रम तयार करण्यात येत आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांकडून होणारे गैरप्रकार रोखणे राज्य मंडळासाठी आव्हानात्मक असते. मात्र, हे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाच्या मार्गदर्शनाखाली नऊ विभागीय केंद्रे आपापल्या स्तरावर उपाययोजना आणि उपक्रम राबवत असतात. या प्रयत्नांमध्ये एकसूत्रता आणण्याची सातत्याने गरज जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाने कृती कार्यक्रम तयार करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून कृती कार्यक्रम मागवण्यात आला आहे. या कृती कार्यक्रमांचे तज्ज्ञ समितीमार्फत परीक्षण करुन दहा कृती कार्यक्रमांची निवड करण्यात येणार आहे. तसेच संबंधित कृती कार्यक्रम पाठवणार्‍यांचा गौरव देखील करण्यात येणार आहे

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘तू मला खुन्नस का दिली?’ म्हणत एकाला बेदम मारहाण !

    March 18, 2026

    ‘गुड बाय’ स्टोरीनंतर धरणगांवच्या विद्यार्थ्याचा जळगावात अंत !

    March 18, 2026

    पोलिसांच्या पेट्रोल पंपातच कोट्यवधींचा घोटाळा; उपनिरीक्षकासह मुलगा न्यायालयीन कोठडीत !

    March 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.