Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नाहीतर मंत्रीपद काढून घेणार… पंतप्रधान मोदींची मंत्री राणेंना भरला दम
    राजकारण

    नाहीतर मंत्रीपद काढून घेणार… पंतप्रधान मोदींची मंत्री राणेंना भरला दम

    editor deskBy editor deskJanuary 3, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल मोठा गौप्यस्फोट केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारायण राणे यांना समज दिल्याचा दावा विनायक राऊत यांनी केलाय. नारायण राणे यांच्या पीएने अनेकांना गंडा घातलाय, असा दावा विनायक राऊतांनी केलाय. नारायण राणे लोकसभेची पायरी विसरले आहेत. पीएला काढा, नाहीतर मंत्रिपद घेणार, अशी समज मोदींनी राणेंना दिल्याचा गौप्यस्फोट विनायक राऊतांनी केलाय.

    “नारायण राणेंनी एक पीए ठेवला होता. पीएची कामं पटवापटवीची. अनेकांना पटवून गंडा घातला. मोदींच्या ते लक्षात आलं आणि वॉर्निंग दिली की, पहिले त्याला हाकलून दे, नाहीतर मंत्रीपद काढून घेणार”, असा दावा विनायक राऊतांनी केला.“नारायण राणे लोकसभेची पायरी चढायला विसरले आहेत. ते अधिवेशनात प्रश्नोत्तरांच्या तासालाही उपस्थित राहत नाहीत”, असं विनायक राऊत म्हणाले. नारायण राणे आणि ठाकरे गट यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. नारायण राणे यांनी अनेकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केलीय. तसेच दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नारायण राणे यांनी थेट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे ठाकरे गट आणि नारायण राणे यांच्यात नेहमी शाब्दिक चकमक घडत असते. विनायक राऊत यांनी याआधीही अनेकदा नारायण राणे यांच्यावर टीका केलीय. यावेळी विनायक राऊत यांनी राणेंबद्दल मोठा गौप्यस्फोट केल्यामुळे ते आता काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. नारायण राणे आणि ठाकरे गट यांच्यातील मतभेद जगजाहीर आहेत. नारायण राणे यांनी अनेकदा ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केलीय. तसेच दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नारायण राणे यांनी थेट युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे ठाकरे गट आणि नारायण राणे यांच्यात नेहमी शाब्दिक चकमक घडत असते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.