Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » माजी मंत्री देशमुखांचे तुरुंगाबाहेर येताच जल्लोषात स्वागत !
    राजकारण

    माजी मंत्री देशमुखांचे तुरुंगाबाहेर येताच जल्लोषात स्वागत !

    editor deskBy editor deskDecember 28, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    महाविकास आघाडी सरकाच्या काळात शंभर कोटींच्या खंडणीप्रकरणी मुंबईच्या मध्यवर्ती कारागृहात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची अखेर आज जामिनावर सुटका झाली. सुमारे १४ महिन्यानंतर त्यांची सुटका झाली आहे. त्यामुळं त्यांच्या स्वागतासाठी तुरुंगाबाहेर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली असून त्यांचं जल्लोषात स्वागत केलं आहे.

    कोर्टाची ऑर्डर तुरुंगाधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्याची संपूर्ण पुर्तता पार पडल्यानंतर संध्याकाळी पाच वाजता अनिल देशमुख ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. एक वर्ष १ महिना आणि २७ दिवस त्यांना तुरुंगात रहावं लागल.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनास आणखी स्थगिती देण्याची सीबीआयची विनंती मुंबई हायकोर्टाने मंगळवारी फेटाळली. त्यामुळे देशमुख यांची आज बुधवारी आर्थर रोड जेलमधून सुटका झाली. सुप्रीम कोर्टास नाताळच्या सुट्या असल्याने जामिनास विरोध करणाऱ्या सीबीआयच्या याचिकेवर सुनावणी न झाल्याने देशमुख यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला होता.
    अनिल देशमुख यांच्या स्वागताला जाण्यासाठी अजित पवार यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमान उपलब्ध करून दिले. यावर चर्चा सुरूय. याबद्दल अजित पवार म्हणाले की, आज दुपारी 1 वाजता मी व राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते मुंबईला आलो आहोत. त्याच विमानाने पुन्हा आजच नागपूरला परतणार आहोत. शासकीय विमाने कुणाला वापरायला द्यायची, हा सर्वस्वी अधिकार राज्यांच्या प्रमुखांना असतो. तसेच, मी देखील विरोधी पक्षनेते व कॅबिनेट मंत्री आहे. त्यामुळे ही सुविधा वापरण्यात गैर काहीच नाही. माध्यमांना यावर भाष्य करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्यावर मी टीका करणार नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शहरात मोकाट कुत्र्यांचा रक्तरंजित धुमाकूळ; एका दिवसात २१ जखमी, प्रशासन झोपेत?

    April 26, 2026

    आ.गायकवाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर शिवसेनेची पलटी; “वैयक्तिक मत” म्हणत घेतली फारकत

    April 24, 2026

    बारामतीत ‘अघोरी’ दाव्यांनी खळबळ; अमोल मिटकरींच्या पोस्टनंतर राजकीय वातावरण तापले !

    April 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.