Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात प्रभा आयुर्वेद रथयात्रेचे जल्लोषात स्वागत
    आरोग्य

    जळगावात प्रभा आयुर्वेद रथयात्रेचे जल्लोषात स्वागत

    editor deskBy editor deskDecember 15, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरात आज दि.१५ डिसेंबर रोजी येथे दोन डिसेंबर पासून तर पाच जानेवारीपर्यंत पूर्ण महाराष्ट्रात जनमानसांमध्ये आयुर्वेदा विषयी आस्था वाढावी म्हणून प्रभा आयुर्वेद रथयात्रेचे आयोजन वैद्य प्रता जोशी धुळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ करण्यात आले आहे.

    संपूर्ण महाराष्ट्राची यात्रा करत करत हा रथ १५ डिसेंबर या दिवशी जळगाव येथे पोहोचला. जळगाव येथे ही रथयात्रा काव्यरत्नावली चौक पासून शिवाजी पुतळ्यापर्यंत निघाली आहे . या रथयात्रेच्या आयोजनामध्ये सुरुवातीला उत्कृष्ट लेझीम पथक त्यानंतर शहनाई वादन , वनस्पती दर्शन , आयुर्वेद ग्रंथ पालखी, आयुर्वेद रथ व तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व वैद्य मंडळी यांचा समावेश होता .

    जळगाव जिल्ह्यातील अकरा वैद्यांचे, की ज्यांनी आपले पूर्ण आयुष्य पणाला लावून आयुर्वेदाची सेवा केली अशांचे सत्कार करण्याचा एक मोठा कार्यक्रम राबविण्यात आला , यामध्ये यामध्ये वैद्य सी व्ही त्रीपाठी, वैद्य पी एस चौधरी, वैद्य विकास गुळवे, वैद्य किशोर मोरे, वैद्य प्रभाकर चौधरी, वैद्य पी जी पिंगळे, वैद्य देवेंद्र शर्मा वैद्य संतलालजी द्विवेदी, वैद्य उषाताई जगताप , वैद्य उषाताई जळूकर, वैद्य जगन्नाथ पाटील आदी वैद्यांचा सत्कार करण्यात आला त्यामध्ये उत्तर महाराष्ट्राचे विद्यापीठातील कुलगुरू डॉ. व्ही एल माहेश्वरी सर , आणि ह भ प दादा महाराज जोशी यांच्या हस्ते तसेच अनेक प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते सत्कार श्री राम मंदिर येथे करण्यात आला. संपूर्ण रथयात्रा ही अत्यंत शिस्तबद्ध रीतीने वैद्य व विद्यार्थी यांनी मिळून पूर्ण मिरवणुकीतून आयुर्वेदाच्या संदर्भातील आरोग्याविषयी माहिती देत व संदेश देत निघाली.

    समारोपाच्या वेळी वैद्य वर्गाने जनतेला स्वास्थ राहाण्या विषयी आरोग्याचे माहिती देत मंतव्य व्यक्त केले व दहा वाजता आयुर्वेद मोफत शिबिराचे उद्घाटन करीत सुमारे 260 रुग्णांची तपासणी मोफत करण्यात आली त्यामध्ये अग्निकर्म , विध्द कर्म, बस्ती मर्मचिकित्सा याविषयीची रुग्णांना माहिती देत व उपचार पद्धती करत मोफत लाभ दिला या पूर्ण रथयात्रेचे आयोजन जळगाव जिल्हा वैद्यसमूह यांचे मार्फत करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भागपूर उपसा सिंचनासाठी शासनाकडून २५० कोटींची मंजुरी !

    March 16, 2026

    टॅनिंगचा त्रास वाढलाय? जाणून घ्या घरगुती सिरम बनवण्याची सोपी पद्धत

    March 11, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.