Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » देशात बलात्कार होत आहे त्यावर बोला ; उर्फी भडकली
    सामाजिक

    देशात बलात्कार होत आहे त्यावर बोला ; उर्फी भडकली

    editor deskBy editor deskDecember 13, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोशल मिडीयावर तुफान चर्चेत असलेली टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि सेलिब्रेटी उर्फी जावेदने आता मोठे विधान केले आहे. आताही ती तिच्या एका प्रतिक्रियेमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उर्फीनं आपण जे काही बोललो त्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे.

    उर्फीच्या विरोधात एकानं पोलिसांकडे तक्रार केल्याचे दिसून आले. उर्फी ही सावर्जनिक ठिकाणी अश्लील हावभाव करणे, अपुरे कपडे यामुळे ती सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसते. उर्फी ही सोशल मीडियावर कायमच तिच्या तऱ्हेवाईकपणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यावर तिनं दिलेली प्रतिक्रिया ही नेटकऱ्यांच्या चर्चेत आली आहे. उर्फीनं दिलेली प्रतिक्रिया ही भलतीच टोकदार असल्याचे दिसून आले आहे.

    https://www.instagram.com/reel/ClQtE-ijGdU/?utm_source=ig_embed&ig_rid=cd2155ca-adde-4195-875d-f5bb78f5f3ff

    दरवेळी मला माझ्या कपड्यांमुळे ट्रोल केले जाते. त्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जातात. पण मला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे, मला कपड्यांवरून बोलण्यापेक्षा देशामध्ये जे बलात्कार होत आहेत ते थांबविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. एकीकडे बलात्कार करुन हत्या केली जाते. मात्र हत्या करणारा मोकाट फिरतो आहे. याकडे आपण गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे. असे उर्फीनं म्हटले आहे. कपड्यांवरुन ट्रोल करुन शहाणपणा शिकवणाऱ्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे. ती म्हणजे आपल्या अवती भोवती जे सुरु आहे त्याकडे लक्ष द्या. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अश्लील कृत्य करणे, अपुऱ्या कपड्यांमध्ये वावरणे यामुळे एका वकीलानं अंधेरी पोलिसांकडे तक्रार अर्ज केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    गुढीपाडव्याचा राज्यभर जल्लोष; शोभायात्रांनी महाराष्ट्र भगवामय

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.