Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » संकटे दूर करण्यासाठी शनिवारी करा हे पाच उपाय !
    सामाजिक

    संकटे दूर करण्यासाठी शनिवारी करा हे पाच उपाय !

    editor deskBy editor deskDecember 10, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    हिंदू धर्मात प्रत्येक दिवस विशेष महत्वाचा आहे. त्यामध्ये शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा केली जाते. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतात. ज्योतिष शास्त्रात शनिदेवाला कलियुगाचा न्यायाधीश म्हटले जाते. ते लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतो. त्यामुळे प्रत्येकाला शनिदेवाला प्रसन्न करायचे असते. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी हे उपाय अवश्य करावेत. हे उपाय केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात. जाणून घेऊया या उपायांबद्दल.

    शनिवारी पिंपळाच्या 11 पानांचा हार बनवावा. आजवळच्या शनि मंदिरात जाऊन शनिदेवाला ही माळा अर्पण करावी. हार अर्पण करताना ‘ओम श्री ह्रीं शाम शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करत रहा. त्यामुळे कोर्ट-कचेरीतील सर्व अडचणी दूर होतील.

    शनिवारी पिंपळाच्या झाडाला सात वेळा प्रदक्षिणा घालताना कच्च्या कापसाचा धागा सात वेळा गुंडाळा. परिक्रमा करताना शनिदेवाचे ध्यान करत राहावे. असे केल्याने थांबलेल्या प्रगतीमधील बाधा दूर होईल.

    वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी शनिवारी थोडेसे काळे तीळ घेऊन पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करा. त्यानंतर पिंपळाच्या मुळाला पाणी अर्पण करावे.

    शनिवारी एक काळा कोळसा घेऊन तो वाहत्या पाण्यात सोडून द्या. तसेच ‘शं शनिश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा. यामुळे तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल आणि तुमचे उत्पन्न वाढेल.

    शनिवारी पुष्प नक्षत्रात एक ग्लास पाणी घ्या. त्यात थोडी साखर घाला. हे पाणी पिंपळाच्या झाडाच्या मुळास अर्पण करावे. तसेच ‘ओम ह्रीं श्री शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करा. यामुळे घरात सुख-समृद्धी नांदेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    गुढीपाडव्याचा राज्यभर जल्लोष; शोभायात्रांनी महाराष्ट्र भगवामय

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.