Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यात १३ हजार सरकारी नोकरी ; इथे करा अर्ज !
    राज्य

    राज्यात १३ हजार सरकारी नोकरी ; इथे करा अर्ज !

    editor deskBy editor deskDecember 2, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    प्राथमिक शिक्षक, टीजीटी, पीजीटी आणि संगीत शिक्षक, प्राचार्य आणि उपमुख्याध्यापक या पदांसाठी केंद्रीय विद्यालय संघटनाने अध्यापन आणि अशैक्षणिक पदांसाठी 13,404 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या विविध पदांसाठी 11 हजार 744 जागा रिक्त आहेत. उर्वरित भरती शिक्षकेतर कर्मचारी वर्गाच्या पदांसाठी आहे. त्यासाठी अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

    या भरती प्रक्रियेअंतर्गत सहाय्यक आयुक्त, प्राचार्य, उपप्राचार्य, TGT,PGT,PRT,ग्रंथपाल, सहाय्यक अभियंता, सहाय्यक, हिंदी अनुवादक आणि लघुलेखक या पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाईल. उमेदवार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. तुम्ही केंद्रीय विद्यालय संघटना भरती 2022 साठी 5 डिसेंबर 2022 ते 26 डिसेंबर 2022 या कालावधीत ऑनलाइन अर्ज करू शकता. या भरतीसाठी 12वी पास देखील अर्ज करू शकतात.

    रिक्त जागांचा तपशील

    एकूण : 13404 पदे

    शिक्षकांच्या पदांवर रिक्त जागा

    एकूण रिक्त जागा – 11744

    प्राथमिक शिक्षक – 6414
    TGT- 3176
    PGT – 1409
    प्राथमिक शिक्षक संगीत – 303
    उपप्राचार्य – 203
    प्राचार्य – 239
    शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जागा
    एकूण- 1649
    सहाय्यक आयुक्त – 52
    स्टेनोग्राफर ग्रेड II – 54
    ग्रंथपाल – 355
    वित्त अधिकारी – 6
    सहाय्यक अभियंता – 2
    सहाय्यक विभाग अधिकारी – 156
    वरिष्ठ सचिवालय सहाय्यक – 322
    कनिष्ठ सचिवालय सहाय्यक-702
    अर्ज शुल्क
    या भरती प्रक्रियेसाठी, सामान्य, OBC आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 1000 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल. तुम्ही अर्जाची फी ऑनलाइन भरू शकता.
    कुठे अर्ज करायचा
    इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट kvsangathan.nic.in वर जाऊन अर्ज करू शकतील.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अशोक खरात प्रकरणात भक्कम पुरावे गोळा करा; मुख्यमंत्र्यांचे पोलिसांना कडक निर्देश !

    April 18, 2026

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026

    धार्मिक यात्रेवरून परतताना काळाचा घाला : जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील ३ जण ठार

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.