Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अभिनेत्री रिचाने उडविली जवानांची खिल्ली !
    सामाजिक

    अभिनेत्री रिचाने उडविली जवानांची खिल्ली !

    editor deskBy editor deskNovember 24, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    भारतीय जवानाचा आपण नेहमीच कौतुक करीत असतो मात्र अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने लष्कराबाबत एक ट्विट केले असून, तिच्यावर लष्कराचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून अभिनेत्री रिचा चढ्ढावर नाराजी व्यक्त होत आहे.

    दरम्यान, उत्तर लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी मंगळवारी सांगितले होते की, पाकव्याप्त काश्मीर परत घेण्यासाठी भारत सज्ज आहे. भारतीय सेना कुठल्याही कारवाईसाठी पूर्णपणे तयार आहे. भारत सरकार जो आदेश देईल त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. असं द्विवेदी म्हणाले होते. या विधानाचा संदर्भ देत रिचा चड्ढाने ट्विटरवर लिहिले की, ‘गलवान ही कह रहा है’. यानंतर भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ‘अभद्र ट्विट. ते लवकर मागे घेतले पाहिजे, आमच्या सशस्त्र दलांचा अपमान करणे योग्य नाही.

    2020 मध्ये गलवानमध्ये भारत आणि चीनमध्ये हिंसक संघर्ष झाला होता, ज्यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले होते. यानंतर भारत आणि चीनमधील संबंध कमालीचे तणावपूर्ण झाले. यामुळे सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी अभिनेत्री रिचा चढ्ढावर नाराजी व्यक्त केली आहे. एका सोशल मीडिया यूजरने कमेंट करून लिहिले की, ‘गॅलवनमध्ये 20 शूर जवानांनी देशासाठी प्राण दिले पण इथे एक अभिनेत्री भारतीय लष्कराची खिल्ली उडवत आहे’.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    गुढीपाडव्याचा राज्यभर जल्लोष; शोभायात्रांनी महाराष्ट्र भगवामय

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.