Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावातील प्रसिद्ध उद्योजकाच्या घरात पिस्तुलधारी दरोडेखोरांचा राडा
    क्राईम

    जळगावातील प्रसिद्ध उद्योजकाच्या घरात पिस्तुलधारी दरोडेखोरांचा राडा

    editor deskBy editor deskNovember 14, 2022Updated:November 14, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    जिल्ह्यातील उद्योजक डी.डी.बच्छाव सर यांच्या निवासस्थानावर सोमवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास पिस्तुलधारी दरोडेखोरांनी लूट करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यावेळी डी.डी.बच्छाव हे पत्नीसह लहान मुलाकडे पुण्याला गेले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रिंगरोडकडून आयएमआर महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या अजय कॉलनीतील बंगल्यात जिल्ह्यातील उद्योजक डी.डी.बच्छाव हे परिवारासह राहतात. त्यांचा मोठा मुलगा किरण बच्छाव हे शोरूमला होते तर त्यांची पत्नी व मुलगा घरी होते. रात्री ९ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे बच्छाव यांचा नोकर कुत्र्याला घेऊन फिरायला गेला. नोकर बाहेर पडताच ६ दरोडेखोरांनी रात्री ९ वाजून ५ मिनिटांनी घरावर धडक दिली. किरण बच्छाव यांच्या पत्नीने दरवाजा उघडताच, एकाने ‘आता बाहेर गेला तो व्यक्ती तुमचा नोकर होता का?’ अशी विचारणा करीत तो बेशुद्ध पडल्याचे सांगितले. तर दुसऱ्याने त्यांचा गळा दाबत मागून हात धरले. योगायोगाने काही मिनिटात किरण बच्छाव देखील घरी पोहचले. दरोडेखोरांनी त्यांचे देखील हात बांधत त्यांना मागील बाजूला घेऊन गेले. घरातील पैसे आणि दागिने कुठे आहेत अशी विचारणा करून त्यांनी मागील दरवाजा उघडण्यास सांगितले. बच्छाव यांनी तो दरवाजा खराब असल्याचे सांगितले.

    बच्छाव कुटुंबियांच्या घरातील आवाज ऐकून बाहेरील नागरिक सतर्क होताच दरोडेखोरांनी मागील बाजूने पळ काढला. दरम्यान, घरात ६ दरोडेखोर शिरले होते त्यापैकी दोघांकडे पिस्तूल तर दोघांच्या हातात चाकू असल्याचे समजते. पिस्तूल नकली असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, गृह अधीक्षक श्री.गावीत, एलसीबी निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्यासह पोलीस पोहचले आहेत

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.