Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कॉंग्रेसने गुजरात निवडणुकीसाठी कसली कंबर !
    राजकारण

    कॉंग्रेसने गुजरात निवडणुकीसाठी कसली कंबर !

    editor deskBy editor deskNovember 14, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली :  वृत्तसंस्था 

    गुजरात विधानसभा निवडणूक 2022 साठी काँग्रेसने मुकुल वासनिक, मोहन प्रकाश, पृथ्वीराज चव्हाण, बीके हरिप्रसाद आणि केएच मुनियप्पा यांची विभागीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर 32 नेत्यांना लोकसभा निरीक्षक बनवण्यात आले असून त्यात प्रेमसाई सिंग टेकम आणि अशोक बैरवा यांच्या नावांचा समावेश आहे.याशिवाय शकील अहमद खान, शिवाजी राव मोगे, कांतीलाल भुरिया, राजेश लिलोथिया आणि जय किशन यांना इतर निरीक्षक करण्यात आले आहेत. गुजरात विधानसभा निवडणूक 2022 संदर्भात आज ‘टास्क फोर्स-2024’ ची बैठक होणार आहे, ज्यामध्ये निवडणूक रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे. काँग्रेसचे संपर्क प्रभारी सरचिटणीस जयराम रमेश, पक्षाचे खासदार दिग्विजय सिंह, राजस्थानचे आमदार सचिन पायलट आणि इतर नेते बैठकीला उपस्थित राहण्यासाठी काँग्रेसच्या वॉर रूममध्ये पोहोचले आहेत.

    काँग्रेस पक्षाने मिशन गुजरातवर लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी पक्ष येत्या 15 दिवसांत एकूण 25 मेगा रॅली काढणार आहे. या रॅलींद्वारे काँग्रेस गुजरातमधील विधानसभेच्या 125 विधानसभा मतदार संघात जाणार असून त्यामध्ये पक्षाचे सर्व मोठे नेते सहभागी होणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधीही या रॅलींमध्ये सहभागी होऊ शकतात. निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या असून राज्यात दोन टप्प्यात मतदान होणार आहे. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात 98 जागांसाठी 1 डिसेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात 93 जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे.गुजरातमधील सर्व 182 जागांसाठी 8 डिसेंबरला एकाच वेळी मतमोजणी होणार आहे. गुजरातमध्ये 4.91 कोटी मतदार असून त्यापैकी 4.61 लाख नवीन मतदार असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वाढदिवसाचा अनोखा आदर्श! नगरसेवक इंजि. नरेंद्र पाटील यांनी गरजूंना रेनकोट वाटून दिला सामाजिक संदेश

    July 30, 2026

    जिल्ह्यातील ६३८ शिक्षकांचे शालार्थ आयडी मनोजच्या माध्यमातून: कोट्यवधींच्या मायाजालाचा धक्कादायक खुलासा?

    July 30, 2026

    बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळा; मनोजसह तीन मराठा नेते SITच्या रडारवर?

    July 29, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.