Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » हिंदुस्थानी भाऊ उर्फीवर भडकला अन झाला राडा !
    राज्य

    हिंदुस्थानी भाऊ उर्फीवर भडकला अन झाला राडा !

    editor deskBy editor deskNovember 14, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सध्या सोशल मिडीयावर विचित्र फॅशनमुळे चर्चेत असणारी उर्फी व शिवराळ भाषेमुळे प्रसिद्ध झालेला हिंदुस्तानी भाऊ यांच्यात जोरदार खडाजंगी झाली आहे. उर्फीच्या कपड्यांवर तिला कडक भाषेत समज देणाऱ्या हिंदुस्तानी भाऊला उर्फीनेही कडक शब्दात प्रत्युत्तर दिले आहे. त्याचा हा वाद सोशल मिडियावर चांगलाच राडा घालत आहे.

    फॅशन जगतात रोज तिच्या कपड्यांवर प्रयोग करणारी उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. उर्फी तिच्या फॅशन सेन्स आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. ती तिच्या लूकने सोशल मीडियावर दहशत निर्माण करते. प्रत्येक वेळी तिची नवीन स्टाईल लोकाना वेड लावते. अत्यंत तोकड्या कपड्या ती कायम समोर येत असते. त्यामुळे अनेकदा ती ट्रोल देखील झाली आहे. पण ‘आता तू स्वतःला आवर घाल.. नाहीतर मी आवरेन..’ अशी धमकी हिंदुस्तानी भाऊने तिला एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.

    https://www.instagram.com/tv/Ck6PMuAtAZx/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading

     

    हिंदुस्तानी भाऊ हा सोशल मिडियावर शिवराळ भाषेत सतत पाकिस्तानला शिव्या देत असतो. याशिवाय अनेक थिल्लर कलाकार त्याच्या रडारवर असतात. मध्यंतरी हिंदुस्तानी भाऊ बिग बॉसमध्येही झळकला होता, त्यामुळे त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. सतत वेगवेगळे विषय घेऊन व्हिडिओ करणाऱ्या हिंदुस्तानी भाऊने आता थेट उर्फी कडे आपला मोर्चा वळवला आहे.
    हिंदुस्थानी भाऊने एक व्हिडिओ करून उर्फीला सुधारण्याची धमकी दिली होती, त्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला आहे, ‘जय हिंद, आज स्वत:ला एक मोठी फॅशन आयकॉन मानणाऱ्या उर्फी जावेदसाठी हा संदेश आहे… ही भारताची प्रथा नाही, ही आपली संस्कृती नाही. तुझ्यामुळे बहिणी-मुलींना खूप चुकीचा संदेश जात आहे. बेटी तू स्वतःला सुधार नाहीतर मी तुला सुधारेन.’
    हिंदुस्थानी भाऊचा हा व्हिडीओ पाहून उर्फी जावेद मात्र चांगलीच चवताळली आहे. तिने एक पोस्ट करत त्याला त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘मला फक्त सुधारणेच नाही तर बिघडवणे देखील माहित आहे. तू मला उघडपणे धमक्या दिल्यास मी तुला तुरुंगात पाठवू शकते हे तुला माहीत आहे का? तुला आठवतंय का काही महिन्यांपूर्वी तू माझ्या फोटोग्राफरला आणि मोहसिनला सांगितलं होतंस की तुला माझ्याशी बोलायचं आहे आणि ओबेद आफ्रिदी प्रकरणात मला मदत करायची आहे. त्यामुळे तू एक लक्षात ठेव तुला फक्त प्रसिद्धी हवी आहे आणि मी तुला साफ नकार दिला होता.’ असे तिने म्हंटले आहे.

    याशिवाय उर्फीने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे. ती म्हणते, ”मला इंटरनेटवर जीवे मारण्याच्या धमक्या मिळतात, याचा मला मानसिक त्रास होतो पण मी अशा लोकांना घाबरत नाही, पण मला माझ्या सुरक्षिततेची काळजी आहे. माझ्यापेक्षा ही लोक जय पद्धतीच्या व्हिडिओ करतात त्यापासून जास्त धोका आहे. मी काय घालते याची त्यांना अजिबात पर्वा नाही, त्यांना फक्त प्रसिद्धी हवी आहे.” असे उर्फीने सडेतोड उत्तर दिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’; सहकार क्षेत्रातील कार्याचा राज्यस्तरीय गौरव

    July 4, 2026

    बळीराजासाठी दिलासादायक बातमी : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील ४८ तासांत जोरदार पावसाचा इशारा

    June 23, 2026

    जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत नंदकिशोर महाजन विजयी !

    June 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.