Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » परिवाराने रंगविले विवाहाचे स्वप्न तरुणाने घेतला शेवटचा निरोप
    अमळनेर

    परिवाराने रंगविले विवाहाचे स्वप्न तरुणाने घेतला शेवटचा निरोप

    editor deskBy editor deskNovember 12, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमळनेर : प्रतिनिधी 

    विवाह हा कोणत्या व्यक्तीच्या आयुष्यातील महत्वाची वेळ असते, त्या आधी होणाऱ्या साखरपुडा हा देखील शुभ मानला जातो परतू अशा आनंदाची वेळेवर अचानक समोर आलेले दुख पाहून कुणालाही मोठा धक्का बसेलच अशीच एक घटना जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे घडली आहे, हि घटना एकून धक्का बसेल.

    अमळनेर शहरातील देशमुख नगर भागात २८ वर्षीय तरुण आपल्या कुटुंबीयासोबत वास्तव्यास होता. त्याचा दि १३ रोजी साखरपुडा ठरलेला असून तो आज नेहमी प्रमाणे सकाळी उठून साखरपुद्याची तयारी म्हणून सलूनमध्ये जावून येतो असे सांगून गेला पण घरी आलेला निरोप परिवाराने एकून धक्काच बसला. २८ वर्षीय तरुण तेजस मनोहर मगर याने सलून जावून येतो सांगून गेला पण जानवे शिवारात असणाऱ्या एका विहिरीत उडी घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना सकाळी १० वाजता घडली. असे वृत्त घरी समजताच कुटुंबावर मोठे संकट कोसळले. तरुणाला ग्रामस्थांच्या मदतीने त्याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला असून त्याच्यावर दुपारी 2 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. जानवे पोलीस पाटील यांनी अमळनेर पोलिसात दिलेल्या माहितीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल हितेश चिंचोरे करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.