Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गुजरात निवडणुकीसाठी गडकरी मैदानात !
    राजकारण

    गुजरात निवडणुकीसाठी गडकरी मैदानात !

    editor deskBy editor deskNovember 12, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    गुजरात निवडणुकीसाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी केली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्याही नावाचा समावेश करण्यात आला आहे.

    विशेष म्हणजे भाजपने ऑगस्टमध्येच आपल्या संसदीय मंडळात बदल केले होते. पक्षाच्या अतिशय महत्त्वाच्या अशा या मंडळातून नितीन गडकरी यांना हटवण्यात आले होते. त्यानंतर पक्षाकडून नितीन गडकरींना साईडलाईन केले जात आहे, अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता पुन्हा नितीन गडकरींचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे. गुजरातमध्ये पुढील महिन्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. गेल्या 27 वर्षांपासून या राज्यात भाजप सत्तेवर आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमुळे भाजपला विधानसभेत 100 आमदारांचा आकडा गाठता आला नव्हता. त्यामुळे यंदा जोरदार बहुमत मिळवण्यासाठी भाजपने सर्व शक्ती पणाला लावली आहे. त्यानिमित्तानेच या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

    स्टार प्रचारकांच्या यादीत नितीन गडकरींसह महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे संसदीय मंडळातून मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही हटवण्यात आले होते. त्यांचादेखील समावेश स्टार प्रचारकांमध्ये करण्यात आला आहे. तसेच, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह 40 जणांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश आहे. संसदीय मंडळातून डच्चू मिळाल्यानंतर नितीन गडकरींच्या काही वक्तव्यांची चांगलीच चर्चा झाली. पुढील निवडणुकीत मी प्रचार करणार नाही, आताचे राजकारण पाहता सन्यास घ्यावा वाटतो, अशी काही वक्तव्ये करुन नितीन गडकरींनी खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात नितीन गडकरींना डावलले जात असल्याची चर्चा झाली. तसेच, काही दिवसांपुर्वीही गडकरींनी काँग्रेसचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे कौतुक केले. मनमोहन सिंह यांनी देशाला ज्या आर्थिक स्थितीत आणले, त्याबद्दल देश त्यांचे आभारी राहील, असे वक्तव्य गडकरींनी केले होते. एकीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन तसेच काही प्रमुख भाजप नेते आर्थिक नितींवरुन मनमोहन सिंह यांच्यावर टीका करत असताना गडकरींच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केले गेले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.