Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव ‘हर हर महादेव’ साठी मनसे रिंगणात
    क्राईम

    जळगाव ‘हर हर महादेव’ साठी मनसे रिंगणात

    editor deskBy editor deskNovember 9, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    राज्यात ‘हर हर महादेव’ चित्रपटावरून जो वाद निर्माण झाला आहे. त्यावरुन आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने थिएटरला जावून शो बंद करण्याची मागणी केली होती त्यानंतर हा चित्रपट जळगाव शहरात प्रदर्शित केला नाही.

    जळगाव शहरातील एका थिएटरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी थिएटरमध्ये जात ‘हर हर महादेव’ चित्रपट प्रदर्शित करावा अशी मागणी करीत थिएटरमध्ये मॅनजरसोबत मोठी खडाजंगी झाली. त्यानंतर थिएटर मॅनेजरांनी सांगितले की, उद्या हा शो सुरु करण्यात येणार आहे. यावेळी दिपक राठोड, राजु डोंगरे, राहुल चव्हाण, हरी सुर्यवंशी, प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळे, दिपक भालेराव यांच्यासह आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उद्या हा चित्रपट सुरु होणार असल्याची माहिती मनसेचे शहराध्यक्ष विनोद शिंदे व आशिष सपकाळे यांनी भ्रमणध्वनीवर दिली आहे. ‘हर हर महादेव’ उद्या सुरु होणार असल्याने एका शोचे 100 तिकीट महाराष्ट्र नवनिर्माण सेना बुक करणार असल्याची माहिती यावेळी शहर उपाध्यक्ष आशिष सपकाळे यांनी बोलतांना सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    ‘दर्पण’कार बाळशास्त्री जांभेकर यांना जळगावमध्ये अभिवादन

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.