Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मंत्री सत्तारांचा समाचार !
    राजकारण

    उपमुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला मंत्री सत्तारांचा समाचार !

    editor deskBy editor deskNovember 8, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलाबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यामुळे राज्यभर राष्ट्रवादीने आंदोलन तीव्र केली होती तर आज उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्री सत्तार याने कान टोचले आहे पण राजीनाम्या बाबत तूर्त मौन बाळगल्याचे चित्र दिसत आहे.

    उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कि, महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी खूप खाली चालली आहे, असे म्हणत अखेर आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तारांचे कान टोचले. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नये. सत्तारांनी केलेले वक्तव्य अतिशय चुकीचे आहे. आम्ही या वक्तव्याचा विरोधच करु. राजकारणात आचारसंहिता पाळायलाच हवी. ही आचारसंहिता ज्याप्रमाणे आम्हाला लागू आहे, त्याप्रमाणे ही आचारसंहिता विरोधकांनाही लागू आहे.

    फडणवीस म्हणाले, अब्दुल सत्तारांच्या वक्तव्याचे समर्थन कुणीही करणार नाही. मात्र, विरोधकही ज्याप्रमाणे खोके-बोके अशी टीका करतात, तीदेखील चुकीची आहे. दोन्ही बाजुंनी आचारसंहिता पाळणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची पातळी येवढ्या खाली जाऊ नये, असे मला वाटते. तसेच, त्या-त्या पक्षातील मोठे नेते आपल्या नेत्यांना याबद्दल काही सांगत नाही, तोपर्यंत हे शक्य नाही, असेही फडणवीस म्हणाले.

    दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोन करत अब्दुल सत्तार यांना सुनावले. त्यानंतर जाहीर सभेत सत्तारांनी आपल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र, अब्दुल सत्तार यांच्या केवळ माफीने काही होणार नाही. तर, त्यांची मंत्रिमंडळातूनच हाकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेत त्यांना यासंदर्भात निवेदन दिले आहे.

    राज्यपालांच्या भेटीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, अशी शिवराळ भाषा वापरणाऱ्या व्यक्तीला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान द्यायचे की नाही, याचा विचार राज्यपालांनी करावा. फडणवीसांनीदेखील त्यांना हे वक्तव्य मान्य आहे की नाही? हे स्पष्ट करावे. अखेर यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट करत सत्तारांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. मात्र, अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेणार की नाही, यावर बोलणे फडणवीसांनी टाळले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.