Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पलक आणि मिथुनने बांधली मुंबईत लग्नगाठ; फोटो केले व्हायरल
    सामाजिक

    पलक आणि मिथुनने बांधली मुंबईत लग्नगाठ; फोटो केले व्हायरल

    editor deskBy editor deskNovember 7, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    ५ रोजी मुंबईमध्ये पलक आणि मिथुन यांचा लग्नसोहळा पार पडला असून त्यांच्या रिसेप्शन पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली. शनिवारी (5 नोव्हेंबर) पलक आणि मिथुन यांचा हळद, मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला होता. या सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

    पलकच्या हळद आणि संगीत सोहळ्याचे फोटो व्हायरल झाले. या फोटोमध्ये पलकचा भाऊ पलाश हा तिला हळद लावताना दिसत आहे. पलकनं 2012 साली प्रदर्शित झालेल्या एक था टायगर या चित्रपटामधील तसेच आशिकी 2 (2013), किक (2014), एक्शन जॅक्सन (2014) प्रेम रतन धन पायो (2015), एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी (2016) काबिल (2017), बाघी 2 (2018) आणि पल पल दिल के पास (2019) या चित्रपटांमधील गाणी गायली आहेत. एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातील कौन तुझे हे पलकनं गायलेलं गाणं लोकप्रिय ठरले.

    https://www.instagram.com/p/CknwTy7K78c/?utm_source=ig_embed&ig_rid=7645b0ee-bb9a-4e88-b4af-e48abeadfcad

     

    पलकनं तिच्या ब्रायडल लूकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मिथुनसोबतचे हे फोटो शेअर करुन पलकनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘आज आम्ही दोघे एक झालो आहोत.’ पलकनं शेअर केलेल्या या फोटोला गायक शान गायिका अदिती सिंह शर्मा आणि अभिनेत्री दिव्या खोसला कुमार यांनी कमेंट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. पलक मुच्छलचा जन्म 30 मार्च 1992 रोजी इंदूर येथे झाला. तिची आई अमिता मुछाल या एक गृहिणी आहेत. तर तिचे वडील राजकुमार मुच्छाल एका खाजगी कंपनीत काम करतात. तिचे शिक्षण क्वीन्स कॉलेज इंदूरमधून झाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    गुढीपाडव्याचा राज्यभर जल्लोष; शोभायात्रांनी महाराष्ट्र भगवामय

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.