Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मानले पांडुरंगाचे आभार !
    राज्य

    उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मानले पांडुरंगाचे आभार !

    editor deskBy editor deskNovember 4, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज ४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपुरात दाखल झाले. यावेळी, फडणवीसांनी सपत्नीक श्री विठ्ठल – रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. तर ५० वर्षांपासून औरंगाबादेतील गुलाबराव साळुंखे-कलावती साळुंखे या वारकरी जोडप्याला पूजेचा मान मिळाला. शेतकरी आणि कष्टकऱ्यांसाठी आपण विठूमाऊलीकडे साकडं मागितल्याचं यावेळी फडणवीस म्हणाले. तर, कार्तिकी एकादशीच्या पूजेचा मान मिळाल्याने फडणवीसांनी पांडुरंगाचेच आभार मानले

    कार्तिकी वारी यात्रेच्या शासकीय महापूजेनिमित्त गुरुवारी उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस पंढरीत आले होते. आज पहाटे मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे व सौ. कलावती साळुंखे यांच्यासह त्यांनी विठ्ठलाची महापुजा केली. त्यांच्यासोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत उपस्थित होते. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम् व्हावा, हिच मागणी विठ्ठलाच्या चरणी केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

    महापुजेनंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घोषणा केल्याप्रमाणे पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. भाविकांना रांगेत जास्त वेळ लागणार नाही, भाविकांना अधिकाधिक सुविधा कशा मिळतील याचा विचार आम्ही आराखडा तयार करताना करत आहोत. त्या पद्धतीने कामे करण्यात येतील. तिरुपतीला गर्दी काळात पण दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागतेच. यामुळे भाविकांना जो पॅटर्न सोयीचा आहे, तो पॅटर्न आम्ही पंढरपूरला राबवू.

    फडणवीस म्हणाले, जवळपास दोन हजार कोटींचा पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आहे. नवीन सोईसुविधांमुळे वारकऱ्यांच्या पंरपरेला बाधा होईल, असे कोणतेही काम करण्यात येणार नाही. याबाबत काळजी घेण्यात येईल. तसेच, तीर्थक्षेत्र आराखड्याचे काम करताना मंदिर परिसरात काही ठिकाणी भू संपादन करावे लागेल. ते करत असताना बाधित लोकांचे योग्य रितीने पुनर्वसन करण्यात येईल. कोणीही विस्थापीत होणार नाही याची दक्षता घेऊ. मात्र, ज्यांच्या जागा घेऊ, त्यांना योग्य मोबदला, त्यांचे योग्य पुनर्वसन करण्याच येईल. कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने नामदेव पायरी, विठ्ठल सभामंडप व विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात सुंदर व आकर्षक अशी फुलांची आरास करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.