Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राज्यात ‘या’कारणाने वडापाव महागणार ?
    आरोग्य

    राज्यात ‘या’कारणाने वडापाव महागणार ?

    editor deskBy editor deskNovember 3, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    राज्यात प्रसिद्ध असलेला वडापाव सुद्धा आता महागणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहे. महाराष्ट्र असो की मुंबई प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा वडापाव आता महागणार असल्याची दाट शक्यता आहे. मुंबईच्या लोकांचा जर सर्वांत जास्त आवडता खाद्यपदार्थ कुठला असेल तर तो नक्कीच वडापाव हे नाव समोर येणार. साधारणतः १० रुपयांपासून विकल्या जाणाऱ्या आणि भुकेला साथ देणाऱ्या वडापाव मुंबईकरांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनलाय. सध्या हाच वडापाव एका वेगळ्या कारणाने चर्चेत आलाय, ते कारण म्हणजे वडापाव महागणार. वडापाव महागण्यामागे एक मोठं कारण समोर आलंय.

    पावाच्या दरात वाढ झाल्याने आता वडापावचा भाव वाढणार आहे. पावसाठी आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. पाव बनवण्यासाठी लागलेला कच्चा माल महागल्याने पावचे दर वाढणार आहे. त्यामुळेच याचा परिणाम थेट वडापाववर पडणार.
    आतापर्यंत पावाचा दर साधारणत: २ रुपये प्रति पाव असा होता. यात उत्पादन खर्च दीड रुपया होता. मात्र आता उत्पादन खर्चच प्रति पाव २ रुपये झाला त्यामुळे पावाची किंमत वाढली. आता ३ रुपयांपर्यंत पावाची किंमत वाढविण्यात आली आहे. सहा पावांची लादी आता १२ ऐवजी १६ रुपयां मिळणार असून विक्रेते आता ही लादी २२ ते २४ रुपयांना विकू शकतात. जर असे झाले तर वडापावचे भाव सुद्धा वाढणार.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    भागपूर उपसा सिंचनासाठी शासनाकडून २५० कोटींची मंजुरी !

    March 16, 2026

    टॅनिंगचा त्रास वाढलाय? जाणून घ्या घरगुती सिरम बनवण्याची सोपी पद्धत

    March 11, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.