Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » डिसेंबरमध्ये हंसिका अडकणार विवाह बंधनात !
    सामाजिक

    डिसेंबरमध्ये हंसिका अडकणार विवाह बंधनात !

    editor deskBy editor deskOctober 31, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था 

    दिवाळी नुकतीच होवून गेली आहे सर्वात आता लग्नाची तयारी झाली असून सर्वत्र लग्नाची धामधुम पहायला मिळणार आहे. बॉलिवूडमध्येही लग्नाची धामधुम पहायला मिळणार आहे. सिंगर पलक मुच्छालही लवकरच प्रियकर मिथूनसोबत लग्न बंधनात अडकणार आहे त्याच्या पाठोपाठ सिद्धार्थ आणि कियारा, आथिया के.एल.राहुल यांच्यासुद्धा लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे. त्यातच आता चित्रपटसृष्टीतील अजून एक अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची माहिती समोर आली आहे. ती माहिती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री हंसिका मोटवानीच्या लग्नाची आहे.

    बॉलिवुड अभिनेत्री हंसिका मोटवानी एका महिन्याच्या कालावधीच्या आतच विवाहबंधनात अडकणार आहे. हंसिका ४ डिसेंबरला लग्न करणार आहे. लग्नविधी 2 डिसेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान आयोजित केला जाणार आहे. हंसिकाचं लग्न डेस्टिनेशन वेडिंग असणार आहे. या विवाहसोहळ्यात फक्त त्यांचे कुटुंब आणि जवळचे मित्रचं सहभागी होणार आहेत. हा लग्न समारंभ जयपूरला पार पडेल. समोर आलेल्या माहितीनुसार 2 ते 4 डिसेंबर मध्ये मेहेंदी, संगीत आणि हळद समारंभ होणार आहे. प्रत्येक दिवसाचा ड्रेस कोड आणि थीम असणार आहे. हा विवाह जयपूरमधील मुंडोटा किल्ला आणि राजवाड्यावर आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगितल आहे.

    तिच्या जवळच्या मित्राच्या माहितीनुसार प्रेम विवाह आहे हंसिका तिच्या प्रियकराशी लग्न करत आहे,ज्याला ती आता काही वर्षांपासून ओळखते.नवऱ्या मुलाचं नाव आणि ओळख दोन्ही अजून उघड झालेलं नाही याबाबत हंसिकाने मीडियाला काहीच स्टेटमेंट दिलेलं नाही. तर लवकरच याची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तो दुसरा कोणीनसून तिचा मित्र आणि बिझनेस पार्टनर सोहेल कथुरियासोबत असल्याचं बोललं जात आहे. हंसिका आणि सोहेल हे 2020 मध्ये स्थापन झालेल्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार असल्याचे सांगितले जाते. याआधी हंसिका तीन चित्रपटांमध्ये तिचा सहकलाकार सिम्बू याला डेट करत होती. 2013 मध्ये या जोडप्याने त्यांचे नाते उघड केले होते मात्र 2014 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ग्रंथदिंडीपासून ग्रंथोत्सवापर्यंत… जळगावात वाचनसंस्कृतीचा जल्लोष

    March 24, 2026

    नंदगाव वीज उपकेंद्राचे लोकार्पण; दिलेला शब्द पूर्ण ; पालकमंत्री पाटील !

    March 21, 2026

    गुढीपाडव्याचा राज्यभर जल्लोष; शोभायात्रांनी महाराष्ट्र भगवामय

    March 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.